आगरदांडा : वादळामुळे झालेल्या नुकसानीबाबत विशेष पॅकेज राज्य शासनाकडून घोषित करण्यात येणार आहे. पूर्वीचे नियम या वेळी शिथिल करण्यात येणार आहेत. क्षेत्र व झाडांची संख्या यावर नुकसानभरपाई देणार आहोत. शासनाला नुकसानीची आकडेवारी सादर केल्यावर लवकरच शासन निर्णय होऊन संबंधितांना भरपाई दिली जाईल. सुपारी झाडासाठी बागायतदारांना नवीन रोपे त्याचप्रमाणे कृषी विद्यापीठाची मदत घेऊन काही झाडे पुन्हा नव्याने लावण्यात येणार आहेत. रायगड जिल्ह्यासाठी फळ लागवड आराखडासुद्धा तयार करणार आहोत. सरकार आपल्या पाठीशी उभे राहणार असून नुकसानग्रस्तांनी चिंता न करण्याचे आवाहन राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी केले आहे.
मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेल्या शंभर कोटींची मदत लवकरच जिल्हाधिकाऱ्यांना देणार असल्याचे त्यांनी सांगितले. रायगड जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे कृ षिमंत्री दादा भुसे बुधवारी आले होते. या वेळी मुरूडमध्ये आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. वादळामुळे मुरूडसह श्रीवर्धन, म्हसळा व अन्य भागात खूप मोठे नुकसान झाले आहे. जीवितहानी झाली नसली मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासन आपल्या पाठीशी आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व अजित पवार कोकणाला जास्तीतजास्त भरपाई देण्यासाठी सकारात्मक आहेत. शासन निर्णय हा लोकांच्या बाजूनेच असणार आहे, जास्तीतजास्त रक्कम वादळग्रस्तांना दिली जाणार असल्याचे पालकमंत्री आदिती तटकरे यांनी मुरूड येथील आढावा बैठकीत सांगितले.या वेळी आमदार महेंद्र दळवी, माजी मंत्री - मीनाक्षी पाटील, प्रांत अधिकारी शारदा पोवार, तहसीलदार गमन गावित आदी उपस्थित होते.दादाजी भुसे यांची नागोठण्याला धावती भेट : राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या रोहा, मुरूड, अलिबाग तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली.या दौºयात त्यांनी सकाळी ११ वाजता नागोठणेत येऊन जिल्हा परिषद सदस्य किशोर जैन यांच्या निवासस्थानी काही क्षण थांबत नागोठणे विभागातील नुकसानीची माहिती जाणून घेतली. येथून रोह्याकडे निघाल्यावर ते येथील ग्रामपंचायत कार्यालयाला भेट देणार असल्याचे समजल्याने ग्रामपंचायत कार्यालयात तालुक्याचे अनेक वरिष्ठ अधिकारी आले होते.कृषिमंत्र्यांनी के ली शेतीची पाहणीच्आगरदांडा : निसर्ग चक्रीवादळामुळे मुरूड तालुक्यात सर्वत्र मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकºयांच्या आंबा, सुपारीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कृषी क्षेत्रातील झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या कृषिमंत्री दादा भुसे यांनी आगरदांडा परिसरातील नुकसानग्रस्त शेतकºयांची भेटघेतली.च्आंबा, नारळाची झाडे मुळासकट उन्मळून पडली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या सर्व नुकसानीची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकºयांचे सांत्वनही केले. तसेच झालेल्या नुकसानीबाबत शासन लवकरच योग्य तो निर्णय घेईल, असे त्यांनी सांगितले.१५ हजार वीज खांबांची ऊर्जामंत्र्यांकडे मागणी - पालकमंत्रीच्बोटींचे तसेच धार्मिक संस्था अन्य बाबींचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. हे वादळ सहा तास राहिल्याने मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बागायतीमधील सुपारीच्या नुकसानीला महत्त्वाचे स्थान देणार असून उचित नुकसानीची रक्कम बागायतदारांना मिळेल, असा विश्वास आदिती तटकरे यांनी व्यक्त केला आहे.च्ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे १५ हजार विजेच्या खांबांची मागणी केली आहे. त्याचप्रमाणे इतर साहित्य देण्याची मागणी केली आहे. लवकरच वादळी भागातील वीजपुरवठा सुरळीत झालेला पाहावयास मिळेल. वसई विरार, कल्याण, डोंबवली भागातून अतिरिक्त कामगार मागविले असल्याची माहिती या वेळी पालकमंत्र्यांनी दिली.