अलिबाग : लोकमत रायगड वर्धापन दिनानिमित्त, जनरल अरुणकुमार वैद्य यांच्या अलिबाग या जन्मगावी, जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील एनसीसी, एनएसएस व कनिष्ठ महाविद्यालयातील १००० विद्यार्थ्यांकरिता ‘लष्करी ध्यासाचा सिक्सपॅक’ या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स लि. यांच्या सहकार्याने गुरुवार, ३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता पीएनपी नाट्यगृहात हा कार्यक्रम होणार आहे. या वेळी आरसीएफचे अध्यक्ष तथा कार्यकारी संचालक उमेश धात्रक विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहाणार आहेत.राज्यात प्रथमच होणाऱ्या या युवाचैतन्याच्या कार्यक्रमात रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी हे मुलाखतकाराच्या भूमिकेत दिसणार आहेत. सूर्यवंशी यांचे सातारा सैनिक स्कूलमधील वर्गमित्र आणि सेना, हवाई व नौदलात यशस्वी वरिष्ठ अधिकारी भारत-पाक सर्जिकल स्ट्राइक यशस्वी लेफ्टनंट जनरल (नि.) राजेंद्र निंभोरकर, एअरमार्शल (नि.) अरुण गरूड, भारतीय सेना मेडल प्राप्त ब्रिगेडियर विनोद श्रीखंडे, कर्नल मदन सावंत, कर्नल (नि.) विनायक सुपेकर आणि मेजर जनरल सतीश वासाडे यांची थेट मुलाखत डॉ. विजय सूर्यवंशी घेऊन तरुणाईमध्ये चेतना जागृतीची अनन्यसाधारण कामगिरी करणार आहेत. संपूर्ण जिल्ह्यात या कार्यक्रमाबाबत प्रचंड औत्सुक्य निर्माण झाले असून, हजारोविद्यार्थी कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.‘लष्करी ध्यासाचा सिक्सपॅक’ अनोखी सन्मान यात्रादरम्यान ‘लष्करी ध्यासाचा सिक्सपॅक’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने अलिबाग समुद्रकिनारा ते पीएनपी नाट्यगृह अशा अनोख्या सन्मानयात्रेचे आयोजन सकाळी ८ वाजता करण्यात आले आहे. आर्मी, नेव्ही व एअरफोर्समधील हे सहा मान्यवरांकरिता विशेष स्फूर्तिरथाची निर्मिती करण्यात आली आहे. रथापुढे रायगड पोलीस बॅन्डच्या तालावर एनसीसी कॅडेट परेड राहील. सन्मानयात्रेचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, आरसीएफचे कार्यकारी संचालक रवींद्र जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, नगराध्यक्ष प्रशांत नाईक, रघुजीराजे आंग्रे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात येणार आहे.खरा सिक्सपॅक देऊन लष्करी अधिकारी निर्माण करण्याचा उपक्रमचित्रपट अभिनेते बॉडीबिल्डिंग व व्यक्तिगत विकासाकरिता ‘सिक्सपॅक’तंत्राचा अवलंब करतात, त्याची भूरळ विद्यमान युवापिढीला पडते आणि ही युवापिढी आपल्या आयुष्यातील ‘हिरो ’ची निवड करताना प्रसंगी चूक करताना दिसते.आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्समधील यशस्वी वरिष्ठ अधिकाºयांना आपल्या आयुष्यात ‘हिरो’ म्हणून स्वीकारून त्यांच्याप्रमाणेच आर्मी, नेव्ही आणि एअरफॉर्समध्ये अधिकारी म्हणून पदार्पण करून देशसेवेबरोबरच देशाचे सन्माननीयनागरिक आपल्या तरुणांनी आर्मी, नेव्ही आणि एअरफॉर्स या आपल्या देशाच्या संरक्षण दलांत पदार्पण करावे, याकरिता युवापिढीत चेतना जागृत करावी, या हेतूने ‘लष्करी ध्यासाचा सिक्सपॅक’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सेना, हवाई, नौदलातील अधिकारी करणार ‘लष्करी ध्यासाचा सिक्सपॅक’वर मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2019 12:12 AM