माणगाव तालुक्यातील लोणेरे, टेंपाले, देवळी ग्रामपंचायतींवर सेनेची सत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 01:58 AM2021-02-12T01:58:35+5:302021-02-12T01:58:41+5:30

रवींद्र टेंबे, संजिदा दाखवे, विनेश डवले यांची निवड

Army control over Lonere, Tempale, Deoli gram panchayats in Mangaon taluka | माणगाव तालुक्यातील लोणेरे, टेंपाले, देवळी ग्रामपंचायतींवर सेनेची सत्ता

माणगाव तालुक्यातील लोणेरे, टेंपाले, देवळी ग्रामपंचायतींवर सेनेची सत्ता

googlenewsNext

माणगाव : तालुक्यातील लोणेरे, टेंपाले, देवळी ग्रामपंचायतीवर सेनेचा भगवा फडकला. लोणेरे सरपंचपदी सेनेचे रवींद्र टेंबे तर टेमपाले सरपंचपदी संजिदा दाखवे, देवळी ग्रामपंचायत सरपंच विनेश डवले यांची निवड झाली.

माणगाव ग्रामपंचायत निवडणुकीत ११ पैकी १० सदस्य निवडून आणत विरोधकांना पुन्हा एकदा धूळ चारत गेली. २५ वर्षे शिवसेनेच्या ताब्यात असलेली लोणेरे ग्रामपंचायत सरपंचपदी पुन्हा एकदा भगवा फडकला असून सरपंचपदी शिवसेनेचे विद्यमान विभागप्रमुख रवींद्र टेंबे यांची वर्णी लागली असून उपसरपंचपदी प्रमोद करकरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 

आमदार भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखाली, जिल्हाप्रमुख अनिल नवगुणे, माजी जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, उपसभापती महेंद्र तेटगुरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या माणगाव तालुक्यातील लोणेरे, टेमपाले, देवळी ग्रामपंचायत सरपंचपदी सेनेचेच सरपंच, उपसरपंच विराजमान झाले आहेत. यावेळी सदस्य प्रकाश टेंबे, समाधान करकरे, सुजाता टेंबे ज्योती ढेपे, शिवाजी ढेपे, अनुष्का टेंबे, प्रियंका श्रीनिवास टेंबे, यांच्यासह अन्य सदस्य देखील उपस्थित होते.

टेमपाले ग्रामपंचायतीच सरपंच निवडणुकीत शिवसेना पाच तर राष्ट्रवादीच्या चार सदस्य असे संख्याबळ असून सरपंचपदी सेनेच्या संजिदा दाखवे तर उपसरपंचपदी गणेश खेळू शिगवण यांची वर्णी लागली आहे. यावेळी सदस्य रूखसार गजगे, गणेश शिगवण, वनिता आंबेकर, शाखाप्रमुख निजाम गजगे, अंकित सैन, हिनायत असलूनकर, अलताफ गोडमे आदींनी शुभेच्छा दिल्या.

बारवई ग्रामपंचायतीवर शिवसेनेची सत्ता
माेहाेपाडा : बारवई ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला असून, सरपंचपदी नियती बाबरे, तर उपसरपंचपदी ललिता पडवळ बिनविरोध निवडून आले. बारवई ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवसेनेच्या ॲड. नियती नीलेश बाबरे व उपसरपंचपदी ललीता वामन पडवळ यांची बिनविरोध निवड झाल्याने शिवसेनेत चैतन्य निर्माण झाले आहे.

बारवई ही ग्रामपंचायत याअगोदर शिवसेना सोडून इतर पक्षांकडे असायची. परंतु नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सातपैकी महाआघाडीच्या सहा जागा तर बीजेपी-मनसे युतीची एक जागा निवडून आली. यात शिवसेनेकडून सरपंच पदासाठी ॲड. नियती नीलेश बाबरे, तर उपसरपंचपदासाठी ललिता वामन पडवल यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सरपंच व उपसरपंच यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. 

    बारवई ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदी ॲड. नियती नीलेश बाबरे, तर उपसरपंचपदी ललिता वामन पडवल यांची निवड होताच कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. यावेळी नवनिर्वाचित सरपंच ॲड. नियती नीलेश बाबरे, उपसरपंच ललिता वामन पडवल, सदस्य म्हणून प्रतीक्षा दीपक तारे, उषा किसन वाघमारे, कीर्ती समीर दळवी आदी उपस्थित होते.
 

Web Title: Army control over Lonere, Tempale, Deoli gram panchayats in Mangaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.