रायगडमध्ये सेना, राष्ट्रवादीची सरशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 04:34 AM2017-10-18T04:34:38+5:302017-10-18T04:34:51+5:30
रायगड जिल्ह्यात सोमवारी झालेल्या १९१ ग्रामपंचायत निवडणुकीपैकी १३ ग्रामपंचायतींमध्ये केवळ थेट सरपंचासाठी मतदान झाले.
नवी मुंबई : रायगड जिल्ह्यात सोमवारी झालेल्या १९१ ग्रामपंचायत निवडणुकीपैकी १३ ग्रामपंचायतींमध्ये केवळ थेट सरपंचासाठी मतदान झाले. १६ ग्रामपंचायतींमध्ये केवळ ग्रामपंचायत सदस्य निवडीकरिता मतदान झाले, तर १६२ ग्रामपंचायतींमध्ये थेट सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य अशा दोन्हीसाठी मतदान झाले. मतमोजणीअंती जिल्ह्याची एकूण अंतिम ग्रामपंचायत सदस्य विजयी उमेदवारांची आणि थेट सरपंचांची आकडेवारी जुळवण्यात निवडणूक यंत्रणेलादेखील अडचणी येत होत्या. रायगडमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक सरपंच निवडून आले आहेत.
अलिबागमध्ये ६ पैकी एक काँग्रेस तर ५ ग्रामपंचायतीत शेकापचे सरपंच विराजमान झाले आहेत. पेणमध्ये २६ ग्रामपंचायतींपैकी काँग्रेस ७, शेकाप ९, शिवसेना ४, तर आघाडी ४ असे बलाबल झाले आहे. पोलादपूर तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींपैकी ११ शिवसेना, तीन काँग्रेस, एक भाजपा,एक आघाडी असा विजय संपादन केला आहे. महाडमध्ये ४७ पैकी काँग्रेस २०, सेना-२०, भाजपा-३ आणि आघाडी ४ असा विजय आहे. म्हसळा ११ पैकी राष्ट्रवादी काँग्रेस ५, आघाडी ६, श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादी ५ आणि शिवसेना २, मुरुड-तालुक्यात ७ पैकी १ शेकाप, ३ सेना तर एक आघाडी, सुधागडमध्ये राष्ट्रवादी ८, शेकाप-२,सेना-२,भाजपा-१, आघाडी एक, माणगावमध्ये राष्ट्रवादी ७, सेना ६, आघाडी ६, खालापूरमध्ये राष्ट्रवादी ९, सेना ५, कर्जतमध्ये राष्ट्रवादी ३, शेकाप १ आणि सेना ३, असे सध्याचे बलाबल आहे.
पनवेलमध्ये भाजपाचा जोर
उरणमध्ये सेना ३, भाजपा ४ आणि आघाडी ११, तळा येथे केवळ एकच ग्रामपंचायत होती. तेथे राष्ट्रवादी जिंकले. पनवेलमध्ये शेकाप ४, सेना १, भाजपा ५, आघाडी १, रोहा येथे ४ ठिकाणी राष्ट्रवादी, तर एका ग्रामपंचायतीत शेकापने बाजी मारली आहे.