रायगडमध्ये आरोग्य सेतू अ‍ॅप सहा लाख नागरिकांच्या पसंतीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 02:20 AM2020-11-26T02:20:34+5:302020-11-26T02:21:21+5:30

मोबाइल अ‍ॅप : वापरकर्त्यांच्या संख्येत दिवसागणिक वाढ

Arogya Setu app in Raigad to the liking of six lakh citizens | रायगडमध्ये आरोग्य सेतू अ‍ॅप सहा लाख नागरिकांच्या पसंतीला

रायगडमध्ये आरोग्य सेतू अ‍ॅप सहा लाख नागरिकांच्या पसंतीला

googlenewsNext

निखिल म्हात्रे

अलिबाग : कोरोना संदर्भात अद्ययावत व वस्तुनिष्ठ माहिती नागरिकांना मिळावी यासाठी शासनाने ‘आरोग्य सेतू’ हे मोबाइल अ‍ॅप विकसित केले 
असून, वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. सध्या शहरासह ग्रामीण भागात ६ लाख ३९ हजार ८१४ नागरिकांनी डाऊनलोड केले असून, ते त्यांच्या पसंतीला  उतरत आहे.

कोरोना विषाणूला रोखण्यासाठी संसर्ग झालेल्या लोकांचा शोध घेणारे ‘आरोग्य सेतू’ मोबाइल अ‍ॅप आहे. म्हणजेच आरोग्य सेतू अ‍ॅप ट्रेसिंग आहे. तसेच तुम्ही सुरक्षित आहात की नाही, हे माहिती पडते. या ॲपमध्ये मोबाइल नंबर, ब्ल्युटूथ आणि लोकेशन डेटाचा वापर केला जातो. ज्या वेळी युजर्स कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात येतो त्या वेळी हे ॲप युजर्सना अलर्ट करते. हे अ‍ॅप ॲण्ड्रॉइड व आयफोन या दोन्ही व्हर्जनवर काम करते. 

संसर्ग रोखण्यात प्रशासनाला यश 
या अ‍ॅपमध्ये कोरोनाचे लक्षणे माहिती करण्यासाठी स्वमूल्यांकन आणि लोकांच्या मदतीसाठी कोरोना हेल्पलाइन सेंटर नंबर दिले आहेत. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जनतेला हे अ‍ॅप डाऊनलोड करून कोरोनापासून आपला बचाव कसा करता येईल, याचे आवाहन केले होते. जिल्ह्याच्या ७६८ ग्रामपंचायतींतील सेवा केंद्राच्या संचालकांनी ग्रामीण भागात नागरिकांच्या घरोघरी जाऊन त्यांना या अ‍ॅपचे फायदे समजावून सांगितले. त्यामुळे जिल्ह्यात सुमारे ६ लाख ३९ हजार ८१४ नागरिकांनी हे अ‍ॅप डाऊनलोड केले असून त्याचा वापर करण्यात येत आहे.

Web Title: Arogya Setu app in Raigad to the liking of six lakh citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड