शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

चाकरमान्यांच्या सुखकर प्रवासाठी बंदोबस्त; २१७ पोलीस अधिकारी, कर्मचारी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 11:13 PM

समस्या सोडविण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावर तैनात

निखिल म्हात्रेअलिबाग : गौरी-गणपती विसर्जनानंतर परतणाऱ्या भक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी पोलीस विभागाने कंबर कसली आहे. परतीच्या प्रवासात कोणताही अडथळा न येण्यासाठी २९ पर्यंत पोलीस अधिकारी आणि कर्मचारी असा एकूण २१७ जणांचा बंदोबस्त मुंबई-गोवा महामार्गावर ठेण्यात आला आहे. त्यामुळे काही पोलीस कर्मचाऱ्यांना घरच्या गणपतीचे दर्शनही घेता आले नाही. मात्र, नागरिकांची सेवा हाच गणेशाचा मोठा आशीर्वाद असल्याचे काही पोलीस कर्मचाºयांनी सांगितले.

जिल्हा वाहतूक पोलिसांचे योग्य नियोजन व पावसाळ्यात पडलेले खड्डे भरले गेल्याने, गणेशभक्तांचा प्रवास करताना वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणावर जाणवत नसल्याचे पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात पोलिसांनी पेण, वडखळ, कोलाड, इंदापूर, माणगाव, महाड, पोलादपूर या ठिकाणच्या बाजारपेठेत गर्दीच्या ठिकाणी रस्त्याच्या मधोमध डिव्हायडर लावून एकेरी वाहतूक सुरू ठेवली होती. त्यामुळे वाहतूककोंडीचा त्रास यावेळी प्रवाशांना जाणवला नाही. मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डेही भरण्यात आल्याने प्रवास सुखकारक झाला आहे.नियुक्त पोलीसपाच दिवसांचे गणपती विसर्जन झाल्यानंतर, कोकणातून ठाणे, मुंबई, पुण्याकडे परतणाºया भक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावर पोलिसांनी विशेष खबरदारी घेत, महत्त्वाच्या स्पॉटवर ६ उपविभागीय पोलीस अधिकारी, ६ पोलीस निरीक्षक, १३ सह.पोलीस निरीक्षक/पोलीस उपनिरीक्षक, २१७ पोलीस कर्मचारी, तसेच पोलीस स्टेशनअंतर्गत स्थानिक स्तरावर बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.रस्ता मोकळा करण्यासाठी विशेष मोहीम : गणपती विसर्जनानंतर गणेशभक्त मुंबई-पुण्याकडे परतणार असल्याने, रस्ता मोकळा करण्यासाठी विशेष मोहीम वाहतूक विभागाने हाती घेतली आहे, वाहतूककोंडी होऊन नये, याकरिता माणगावमधून काढलेल्या पर्यायी मार्गाचा वापर करावा व या गणेशभक्तांनी नियमांचे पालन करीत गाडी चालविल्यास प्रवास सुखकर होणार, हे निश्चित अशी प्रतिक्रि या वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक आर. पी शिंदे यांनी दिली.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव