परळी येथे विनापरवाना दारू विकणा-यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 02:36 AM2017-12-13T02:36:42+5:302017-12-13T02:36:51+5:30
परळी येथे दारूची राजरोस विनापरवाना विक्री होते, असा निनावी फोन उपविभागीय पोलीस अधिकारी रोहा यांना आला. त्यानुसार रोहा पोलीस अधिका-यांनी ९ डिसेंबर रोजी परळी येथे संध्याकाळी पावणेआठच्या सुमारास छापा टाकला असता विदेशी दारूची विक्री सुरू असताना छापा टाकून ७० हजारांची विदेशी दारू व बीअरच्या बाटल्यांचे खोके ताब्यात घेतले आहे.
पाली : परळी येथे दारूची राजरोस विनापरवाना विक्री होते, असा निनावी फोन उपविभागीय पोलीस अधिकारी रोहा यांना आला. त्यानुसार रोहा पोलीस अधिका-यांनी ९ डिसेंबर रोजी परळी येथे संध्याकाळी पावणेआठच्या सुमारास छापा टाकला असता विदेशी दारूची विक्री सुरू असताना छापा टाकून ७० हजारांची विदेशी दारू व बीअरच्या बाटल्यांचे खोके ताब्यात घेतले आहे.
परळी येथे सुनील कारेकर यांच्या घराजवळचे परमीट रूम बंद झाल्याने विदेशी दारू व बीअर
विक्र ीचा धंदा करीत असल्याचे निनावी फोन रोहा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयात येत होते. या माहितीवरून छापा टाकला. यावेळी एक महिला दारू विक्र ी करताना आढळली. या महिलेकडे विदेशी दारूच्या बाटल्या आढळल्या व रश्मी कारेकर यांना ताब्यात घेतले. तिच्याकडून १२,६५७ रु पयांची दारू जप्त केली.
यानंतर परिसराची झडती घेत असताना संशयित सुनील कारेकर हा एका खोलीजवळ फिरताना आढळला. खोलीचा संशय आल्याने पोलिसांनी पंचासमक्ष खोलीचे कुलूप तोडले यावेळी बीअरच्या बाटल्यांचे खोके आढळले. ५७,७५० रु पयांचा हा माल ताब्यात घेतला. या प्रकरणी सुनील वीरेश्वर कारेकर व रश्मी सुनील कारेकर यांच्यावर कारवाई केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पीएसआय एस.बी. पाटील करीत आहेत.