बोर्ली-मांडला /मुरु ड : मनुष्य हा शरीराने अपंग असू शकतो मात्र त्याच्याकडे असणारी कला अपंग नसते ती एक वरदान आहे, कलेची जोपासना अपंग व्यक्ती करीत आले असे, प्रतिप्रादन रायगड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश गोटे यांनी समविचारी अपंग संघर्ष समितीतर्फेअपंग बांधवाकडे असणाऱ्या कलांना दाद देण्यासाठी रायगड जिह्यातील अलिबाग चोंढी येथील आयोजित कार्यक्र मात केले.अविनाश गोटे म्हणाले की, काही सदृढ लोकांचा अपंगांकडे बघण्याचा दृष्टीकोन हा वेगळा आहे तर काही जण अपंग हे आपल्यातील एक घटक आहे असे मानून त्यांच्या कलांना वाव देण्याचे कार्य करीत असतात. आई फाऊंडेशन ही सेवाभावी संस्था ही कोणाकडेही देणगी न घेता पदाधिकारी हे स्व खर्चनाने समाजातील दुर्लक्षीत अशा अपंग बांधवाना नि:स्वार्थी मदत करीत असतात. ह्यांचा आदर्श इतर संस्थेनी घ्यावे, असे आवाहन गोटे यावेळी केले. यावेळी समितीचे अध्यक्ष साईनाथ पवार म्हणाले की, रायगड जिल्यातील ३४ अपंगाच्या संघटना ह्या एकित्रत येऊन त्यांनी समविचारी अपंग संघर्ष समितीची स्थापना केली आहे. अपंगांकडे असणारी छुपी कला ही सर्वांच्या समोर यावी म्हणून या कार्यक्र माचे नियोजन करण्यात आले आहे. येत्या डिसेंबरमध्ये राज्यव्यापी अपंगांचे ६ वे अधिवेशन रायगड जिल्ह्यात होणार असून त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मंत्री उपस्थित राहणार आहेत. आई फाऊंडेशनकडून अपंग बांधवाना ३२ व्हीलचेअर, २० कुबड्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी आई फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र साळुंके आदी उपस्थित होते.
कला कधी ही अपंग नसते
By admin | Published: September 12, 2016 3:18 AM