शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

माथेरानमध्ये कृत्रिम महागाई!

By admin | Published: March 27, 2017 6:17 AM

दिवसेंदिवस समस्यांचा ससेमिरा पाठलाग करीत असताना माथेरानमध्ये वाहतुकीच्या गहण समस्येमुळे नागरिकांनी आजपर्यंत

मुकुंद रांजणे / माथेरानदिवसेंदिवस समस्यांचा ससेमिरा पाठलाग करीत असताना माथेरानमध्ये वाहतुकीच्या गहण समस्येमुळे नागरिकांनी आजपर्यंत स्वत:हून या समस्येचा पाठपुरावा न केल्यामुळे तसेच येथील काही हेकेखोर वृत्तीच्या संघटनेमधील मूठभर लोकांची नेहमीच आडकाठी केल्यामुळे इतर सर्वसामान्य लोकांनी, व्यावसायिकांनी मूठभर कृत्रिम महागाई ओढवून घेतली आहे. आयुष्यातील दिनक्रम संघर्षामध्येच कंठीत, आपापल्या कुटुंबाच्या पालनपोषणासाठी तारेवरची कसरत माथेरानकर करीत आहेत. यातच सर्वच जीवनावश्यक वस्तूसुद्धा वाढीव दराने खरेदी कराव्या लागत आहेत, याचा नाहक भुर्दंड नाइलाजास्तव स्थानिकांसह पर्यटकांनादेखील सहन करावा लागत आहे.माथेरान हे पूर्वीपासूनच प्रदूषणमुक्त पर्यटनस्थळ घोषित केल्यामुळे येथे आजही रुग्णवाहिके शिवाय अन्य मोटार वाहनांस बंदी केली गेली आहे. त्यामुळे सर्वच सामान अर्थातच जीवनावश्यक वस्तू आणि बांधकामासाठी लागणारे साहित्य हे वाढीव दरानेच खरेदी करावे लागत आहेत. यामध्ये वस्तूंच्या किमती या कंपनी प्रिंट दरापेक्षा अधिक रक्कम देऊन खरेदी कराव्या लागत आहेत. अनेकदा दुकानदार आणि पर्यटक ग्राहकांमध्ये शाब्दिक वाद होत आहेत. येथे येणारा सर्वच माल हा दस्तुरी नाक्यापर्यंत टेम्पोमधून आल्यावर गावात आणण्यासाठी हातगाडी किंवा घोड्यावरून वाहतूक होत आहे. त्यामुळे या वाहतुकीचा खर्चदेखील व्यापारी, दुकानदारांना परवडत नसल्याने प्रत्येक वस्तूमागे प्रिंटपेक्षा अधिक रक्कम दुकानदार घेत आहेत. हे असेच यापुढेही सुरू राहिले तर भविष्यात याचा येथील पर्यटनावर विपरीत परिणाम होऊन सर्वांचे व्यवहार पूर्णत: ठप्प होऊ शकतात. शासन दरबारी अनेकदा पर्यायी मार्गासाठी याबाबत पाठपुरावा करूनदेखील वाहतुकीची समस्या मार्गी लावण्यासाठी सरकार असमर्थता दर्शवित आहे. नगरपरिषदेच्या निविदेतील विकासकामांची रक्कम अन्य ठिकाणी पाच कोटी रुपयांत होत असेल, तर त्याच कामांसाठी येथे जवळपास दहा कोटींहून अधिक रक्कम नगरपरिषदेला खर्च करावी लागत आहे. त्यामुळे वाहतुकीपायीच सरकारचा पैसा नाहक व्यर्थपणे खर्च होत असल्याने याचा नगरपरिषदेच्या तिजोरीवर वाहतुकीच्या कारणास्तव अधिक भार पडत आहे.येथील वाहतुकीच्या समस्येमुळे माथेरानकर हैराण झाले आहेत, त्यातच मिनी ट्रेन बंद असल्याने अधिक फटका बसत आहे. बजेट कोलमडलेच्मुंबई-पुण्याला एखाद्या इमारतीच्या बांधकामांसाठी २५०० रु पये स्क्वेअर फूट खर्च येतो तोच खर्च येथे ४००० रु पये प्रति स्क्वेअर फुटांसाठी मोजावे लागत आहेत. च्त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तूंसाठी पाणी बाटली १५ रुपयांची असेल त्यासाठी २० रुपये द्यावे लागतात. च्दूध व इतर दैनंदिन गोष्टीसुद्धा वाढीव दराने मिळतात. गॅस सिलिंडरसुद्धा जवळपास येथे आठशे रु पयांनी खरेदी करून सिलिंडरच्या हमालीकरिता अंतराप्रमाणे पन्नास ते शंभर रुपये अधिक मोजावे लागतात. एकंदरीतच महिलांचे घर चालविण्याचे बजेट कोलमडत आहे.माथेरानकरांनो, जागे व्हावाहनबंदीचा परिणाम माथेरानमधील बँकिंग क्षेत्रावरदेखील झाला आहे. युनियन बँक ही एकमेव बँक माथेरानमध्ये आहे. सध्या व्यावसायिकांना कर्जदेखील देत नसल्याने सुशिक्षित बेरोजगारांना कर्ज मिळत नाही. बऱ्याच बँका माथेरानला शाखा उघडण्यासाठी सर्व्हे करतात केवळ वाहतूक व्यवस्था योग्य नसल्याने शाखा उघडत नाहीत. त्याचप्रमाणे एटीएम सुविधादेखील देण्यास तयार होत नाहीत. दरवर्षी दहा लाख पर्यटक येथे भेट देतात, केवळ दोन एटीएम असल्याने पर्यटकांची मोठी गैरसोय होते. याचा परिणाम स्थानिक व्यवसायावर नेहमीच होत आहे. रस्त्यांवर व्यवसाय करणाऱ्या काही संस्था, संघटनांनी वाहतुकीच्या बाबतीत सकारात्मकता दर्शवली नाहीच तर भविष्यात येथून सर्वांनाच हळूहळू काढता पाय घ्यावा लागेल, असे जाणकार मंडळींचे म्हणणे आहे.वाहतुकीचा प्रचंड मनस्ताप येथे आजपर्यंत अनुभवायास मिळत आहे. अव्वाच्या सव्वा रक्कम हमालीसाठी देऊनसुद्धा वेळप्रसंगी मजूर मिळत नाहीत. मोटार वाहनांस बंदी असल्याने नाइलाजास्तव वाहतुकीच्या जटील समस्येमुळे येथे वाढीव दर आकारले जातात. शासन जर मोटार वाहने प्रदूषणापायी येऊ देत नसेल तर निदान पर्यावरणपूरक ई-रिक्षा सुरू करण्यासाठी तरी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन इथल्या समस्या मार्गी लावाव्यात.- दीपक शहा, अध्यक्ष, व्यापारी असोसिएशन, माथेरानग्राहक संरक्षण कायदा १९८६ अन्वये छापील (एम.आर.पी. ) किमतीत ग्राहकांना वस्तू विकल्या पाहिजेत हा ग्राहकांचा अधिकार आहे. मात्र, वाहनबंदी कायद्यामुळे दुकानदारांना वाहतुकीचा खर्च जास्त येतो, त्यात ग्राहकांचे आर्थिक शोषण होते, त्यामुळे वाहनबंदी कायद्यात बदल केला पाहिजे.- सुनील शिंदे, प्राध्यापक, माथेरान