अश्वमेध यज्ञात महिला सक्षमीकरण, अंमली पदार्थमुक्त भारताचा नारा; लाखो भाविकांची हजेरी

By वैभव गायकर | Published: February 26, 2024 12:45 AM2024-02-26T00:45:19+5:302024-02-26T00:45:56+5:30

पाच दिवसात 27 लाख भाविकांची अश्वमेध यज्ञाला भेट

Ashwamedha yajna women empowerment, drug free India slogan; Attendance of lakhs of devotees | अश्वमेध यज्ञात महिला सक्षमीकरण, अंमली पदार्थमुक्त भारताचा नारा; लाखो भाविकांची हजेरी

अश्वमेध यज्ञात महिला सक्षमीकरण, अंमली पदार्थमुक्त भारताचा नारा; लाखो भाविकांची हजेरी

वैभव गायकर, लोकमत न्युज नेटवर्क, पनवेल: मागील चार दिवसापासून खारघर शहरातील हाईड पार्क मैदानात सुरु असलेल्या भव्य दिव्य अश्वमेध यज्ञाला तब्बल 27 लाख अनुयायांनी आपली हजेरी लावली.रविवारी या सोहळ्याच्या शेवटच्या दिवशी उपस्थितांनी महिला सक्षमीकरण तसेच अमली पदार्थ मुक्तीचा नारा देण्यात आला.

या भव्य दिव्य अश्वमेध यज्ञातील 1008 कुंडी यज्ञात लाखो लोकांनी प्रत्यक्ष सहभाग घेत पर्यावरण शुद्धीची मनोकामना केली.पाच दिवसात रक्तदान,अन्नदान तसेच अवयव दानाचे कार्यक्रम पार पडले.अखिल विश्व गायत्री परिवाराने मुंबई अश्वमेध यज्ञ आयोजित केला होता. नव्या भारताचे नवे चित्र जगासमोर मांडण्याच्या निर्धाराने आयोजित केलेला  पूर्णाहुतीने महायज्ञ यशस्वीपणे पार पडला. अश्वमेध महायज्ञ दि. 21 पासून सुरु झाला होता.पाच किलोमीटर कलश यात्रेच्या 
प्रवासासोबत या सोहळ्याचा आरंभ झाला होता. महायज्ञात कला, राजकारण आणि चित्रपट जगतातील बड्या व्यक्तींनीही सर्वसामान्य भाविकांच्या सोबत पूर्ण श्रध्देने आणि विश्वासाने भाग घेतला आणि वेगवेगळ्या दिवशी यज्ञात आहुती दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अश्वमेध महायज्ञात प्रत्यक्ष सहभागी झाले नसले तरी त्यांनी आपल्या ऑनलाईन स्वरूपात आपल्या शुभेच्छा व्यक्त करीत .गायत्री परिवाराच्या कार्याचे कौतुक केले.अखिल विश्व गायत्री परिवाराचा प्रत्येक कार्यक्रम पवित्रतेने पूर्ण होतो, ही अभिमानाची गोष्ट आहे. अश्वमेध महायज्ञातून तरुणांच्या चारित्र्यावर घेतलेली प्रतिज्ञा राष्ट्राच्या उभारणीसाठी आहे.अश्वमेध महायज्ञ यशस्वीरित्या पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधानांनी डॉ. चिन्मय पंड्या आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन केले.

अश्वमेध यज्ञासाठी कैद्यांनी पाठवले 50 हजार पणत्या

खारघर शहरातील भव्य दिव्य अश्वमेध यज्ञाला मागील चार दिवसापासून जनसागर लोटला आहे. शनिवारी महाराष्ट्र,मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेशातील विविध कारागृहातील कैद्यांनी पाठवलेल्या पणत्यांचे दीप महायज्ञ शनिवारी या सोहळ्याठिकाणी पार पडले.या दीप महायज्ञाच्या 50 हजार पणत्यांनी हाईड पार्क येथील मैदान उजळले होते.

Web Title: Ashwamedha yajna women empowerment, drug free India slogan; Attendance of lakhs of devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :panvelपनवेल