अलिबाग : महाराष्ट्राला हादरवणाऱ्या साहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणातील आरोपी, राजेश पाटील याच्या जमीन अर्जावरील सुनावणी अलिबाग येथील सत्र न्यायालयात पूर्ण झाली आहे. याचा निकाल १३ एप्रिलपर्यंत पुढे ढकण्यात आला आहे. राजेश पाटील हा माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा भाचा आहे.बिद्रे यांच्या हत्या प्रकरणात ताब्यात असलेल्या आरोपींपैकी फक्त राजेश पाटील यानेच जामिनासाठी पंधरा दिवसांपूर्वी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. बिद्रे यांची हत्या झाली, त्या दिवशी अंधेरीतील एका हॉटेलमध्ये राजेश पाटील तेथे हजर होता. त्याचबरोबर, त्याने अश्विनी बिद्रे यांची हत्या करून, त्यांच्या शरीराचे तुकडे भार्इंदरच्या खाडीत टाकण्यात त्याचाही सहभाग होता, असे तपासात समोर आले आहे. १0 डिसेंबरला त्याला बेळगाव येथून पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. कळंबोली पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची तक्र ार दाखल झालेली आहे. प्रथमत: त्याच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल होता. आता हत्येतील प्रत्यक्ष सहभागामुळे खुनाचाही गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती जिल्हा सरकारी वकील अॅड. संतोष पवार यांनी दिली. या जामीन अर्जावरील निकाल १३ एप्रिल रोजी दिला जाणार असल्याची शक्यता आहे.>मुख्य आरोपी कुरुं दकर हा पोलीस अधिकारी आहे, तर राजेश पाटील हा माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा भाचा आहे. त्यांच्यामार्फत साक्षीदारांवर दबाव टाकला जाऊ शकतो. त्यामुळे हा गुन्हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, तसेच त्यावर सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण, आरोपीचा जामिनासाठी अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2018 5:45 AM