अपघातातील मृतांच्या नातेवाइकांना पेन्शनसह ४ लाखांपर्यंत मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 01:34 AM2018-02-21T01:34:22+5:302018-02-21T01:34:25+5:30
अपघाती निधन झालेल्या मृतांच्या नातेवाइकांना कामगार राज्य विमा महामंडळातर्फे सुमारे चार लाखांपर्यंत मदतीचे धनादेश देण्यात आले.
पनवेल : अपघाती निधन झालेल्या मृतांच्या नातेवाइकांना कामगार राज्य विमा महामंडळातर्फे सुमारे चार लाखांपर्यंत मदतीचे धनादेश देण्यात आले. त्याचप्रमाणे संबंधित वारसाच्या नावे दर महिन्याला पेन्शनही देण्यात येणार आहे.
दत्तात्रेय केदारी आणि सुजय वायले हे दोघे तळोजातील असाही ग्लास कारखान्यामध्ये कामाला होते. दोन वर्षांपूर्वी कारखान्यातून घरी जाताना त्यांचे अपघाती निधन झाले. दत्तात्रेय केदारी यांच्यामागे पत्नी व दोन मुले असून, कामगार राज्य विमा महामंडळातर्फे पत्नीच्या नावे अडीच लाखांचा धनादेश देण्यात आला. सुजय वायले यांच्या पश्चात आई व एक भाऊ असून, आईला ९० हजारांचा धनादेश देण्यात आला आहे. तसेच महिन्याला सुमारे ११ हजार रु पये पेन्शन म्हणून देण्यात येणार आहेत.
सोमवारी कामगार राज्य विमा मंडळाच्या पनवेल शाखेमध्ये हे धनादेश मृतांच्या नातेवाइकांना सुपूर्द करण्यात आले. या वेळी पनवेल शाखा व्यवस्थापक डी. एन. दिनकर, मेरीटाइम जनरल कामगार संघटनेचे वैभव पाटील आदी उपस्थित होते.