रोहा : राज्याच्या सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभाग यांच्या मार्फत अटल महापणन विकास अभियान संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत रोहा तालुका स्तरीय कार्यशाळेचे आयोजन २० जानेवारी रोजी रोहा येथील भाटे सार्वजनिक वाचनालय सभागृहात करण्यात आले होते. तालुका खरेदी विक्र ी संघ आणि विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांंचे बळकटीकरण करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे. याअभियानांतर्गत खरेदी विक्र ी संघ आणि सेवा सोसायटयांंच्या सभासदांची वाढ करणे, आर्थिक उलाढाल वाढीसाठी प्रयत्न करणे, शेतीमालाला हमी भाव मिळवून देणे, शेती मालाच्या भावात स्थिरता निर्माण करण्याची गोदामांची आणि शीतगृहांची उभारणी करणे, शेतकऱ्यांना कृषी अवजारे, खते, किटकनाशके, बियाणे यांची उपलब्धता होण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करणे, धान्याची प्रतवारी करणे, महिला बचत गटाची उत्पादने खरेदी करून त्याची विक्र ी करणे असे विविध कार्यक्र म कशा प्रकारे राबविण्यात यावेत याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. हे अभियान लोकांपर्यंत पोहचिवण्यासाठी प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन, क्षेत्रिय भेटी, व्यक्तीगत संपर्क यामाध्यमातून उपाययोजना राबविण्यात येत आहेत. २५ डिसेंबर २०१६ ते ३१ मार्च २०१७ या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती भंडारे यांनी दिली. या कार्यशाळेला रोहा तालुका खरेदी विक्र ी संघ,कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांचे सभापती व सर्व संचालक तसेच रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
अटल महापणन विकास कार्यशाळा
By admin | Published: January 23, 2017 5:40 AM