Video : महाडमध्ये तणावाचे वातावरण; शिवसेनेकडून रास्ता रोको, नारायण राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची गाढवावरुन धिंड

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 07:57 PM2021-08-24T19:57:50+5:302021-08-24T19:58:36+5:30

Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरुद्ध महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

An atmosphere of tension in Mahad; A symbolic statue of narayan rane rally on Donkey; Rasta Roko from shiv sena | Video : महाडमध्ये तणावाचे वातावरण; शिवसेनेकडून रास्ता रोको, नारायण राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची गाढवावरुन धिंड

Video : महाडमध्ये तणावाचे वातावरण; शिवसेनेकडून रास्ता रोको, नारायण राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची गाढवावरुन धिंड

Next
ठळक मुद्देमहाड शहरात आज राणे यांच्या विराेधात घाेषणा देण्यात आल्या. राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची गाढवावरुन धिंड काढण्यात आली.

दासगाव : महाडमध्ये आलेल्या जन आशीर्वाद यात्रेनिमित्त झालेल्या एका पत्रकार परिषदेत मंत्री नारायण राणे यांनी मुख्य मंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल अपमानास्पद व्यक्तव्य केले हाेते. त्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली हाेती. राणे यांच्या विराेधाेत महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ठिकठिकाणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदाेलन केले. 

महाड शहरात आज राणे यांच्या विराेधात घाेषणा देण्यात आल्या. राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची गाढवावरुन धिंड काढण्यात आली. केंद्रीय मंत्री पदी वर्णी लागल्याने राणे यांची जन आशिर्वाद यात्रा काेकणात सुरु आहे. साेमवारी त्यांची यात्रा महाड येथे आली हाेती. महाड मध्ये भाजपा कडून त्यांचे स्वागत करण्यात आले .शहरातील चवदार तळे येथे डॉक्टर बाबा साहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला राणे यांनी अभिवादन केले. तेथून शिवजीचौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्प हार अपर्ण करण्यात आला. नंतर राष्ट्रीय स्मारक येथे महाड पुरा संदर्भात व्यापारी वर्गा कडे संवाद साधला. त्यानंतर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या पीजी सिटी या हॉटेल च्या हॉल मध्ये सायंकाळी ७ वाजता पत्रकार परिषदेला सुरवात करण्यात आली. या पत्रकर परिषदेमध्ये मंत्री नारायण राणे यांनी १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दीना निमित्त मुख्य मंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणा संदर्भात एका विषयावर त्यांच्यावर टीका करत मी असतो तर त्यांच्या काना खाली ओढली असती असे म्हणत त्यांचा अपमान केला. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रा मध्ये राणे यांच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात आला.सध्या महाड शहर आणि परिसरात राजकीय वातावरण तापू लागले असल्याने शहरातील अनेक मुख्य ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Web Title: An atmosphere of tension in Mahad; A symbolic statue of narayan rane rally on Donkey; Rasta Roko from shiv sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.