दोन आदिवासी महिलांवर अत्याचार, तक्रार दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 06:42 AM2017-12-11T06:42:52+5:302017-12-11T06:43:00+5:30
म्हसळ्यात आदिवासी महिलेसह तिच्या अल्पवयीन सावत्र बहिणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा घृणास्पद प्रकार घडला आहे. या प्रकरणी संबंधित महिलांनी म्हसळा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्र ार दाखल केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
म्हसळा : म्हसळ्यात आदिवासी महिलेसह तिच्या अल्पवयीन सावत्र बहिणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा घृणास्पद प्रकार घडला आहे. या प्रकरणी संबंधित महिलांनी म्हसळा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रार दाखल झाल्या-झाल्या एका तासाच्या आतच आरोपीस जेरबंद करण्यात म्हसळा पोलिसांना यश आले आहे.
युनुस उर्फ मुन्ना पठाण (३५, रा. पाभरे), याने पीडित महिलेच्या कुटुंबाला आपल्या आंब्याच्या बागेची रखवाली करण्यास ठेवले होते. या पीडित महिलेच्या असाहाय्यतेचा फायदा घेऊन मुन्ना याने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले, त्यातून ती तीन वेळा गर्भवती राहिली. यापैकी एक वेळा गर्भपात केला. दुसरे मूल दोन-तीन महिन्यांचे असताना मरण पावले व शेवटच्या गर्भधारणे वेळी प्रकरण अंगलट येऊ नये, म्हणून त्याने तिला कामावरून हाकलून दिले. त्यानंतर तिच्या अल्पवयीन सावत्र बहिणीशी लैंगिक संबंध ठेवले. ही बाब लक्षात आल्यानंतर पीडित महिलेने म्हसळा पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली. पीडित महिलेच्या फिर्यादीनुसार म्हसळा पोलीस ठाण्यात अॅट्रासिटी, पॉस्को अंतर्गत रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. या आरोपीला सहायक पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड आणि त्यांच्या सहकाºयांनी तासाभरात शनिवारी रात्री उशिरा अटक केली. पुढील तपास सुरु आहे.
परिसरात खळबळ
आदिवासी महिलेच्या अशा प्रकारे शोषण झाल्याने परिसरात खळबळ उडाली
आहे.
या आरोपीला सहायक पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड आणि त्यांच्या सहकाºयांनी तासाभरात शनिवारी रात्री उशिरा अटक केली.