नेरळमध्ये तीन महिलांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
By Admin | Published: July 12, 2015 10:32 PM2015-07-12T22:32:50+5:302015-07-12T22:32:50+5:30
येथील सविता राठोड यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला. त्याबद्दल नेरळ पोलीस ठाणे येथे तीन महिलांविरु द्ध अॅट्रॉसिटी अॅक्टखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
नेरळ : येथील सविता राठोड यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला. त्याबद्दल नेरळ पोलीस ठाणे येथे तीन महिलांविरु द्ध अॅट्रॉसिटी अॅक्टखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
नेरळ ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या सविता राठोड या साईकृपा सोसायटी भागातील राठोड आळीमध्ये राहतात. त्यांच्या घराच्या बाजूने नेरळ ग्रामपंचायतीने रस्ता तयार केला आहे. तेथे आचार्य या कुटुंबाने तीन मजली इमारत बांधली आहे. त्या इमारतीसाठी लागणारे साहित्य नेण्यासाठी आचार्य कुटुंबातील तीन महिलांनी सविता राठोड यांच्या घराच्या कुंपणाची भिंत तोडून तेथून नवीन रस्ता तयार केला. हा प्रकार मेमध्ये घडत असताना सविता राठोड यांनी घराचे कुंपण तोडण्याबाबत जाब विचारला. त्याचवेळी राठोड यांनी कुंपण पुन्हा
दुरु स्त करून देण्याची मागणी केली. यावर नेत्रावती आचार्य, शेत्रावती आचार्य आणि चंद्रावती आचार्य या तिघींनी सविता राठोड यांना जाती वाचक शिवीगाळ केली. याबाबतची तक्रार नेरळ पोलीस ठाण्यात केली होती. चौकशीअंती नेरळ पोलिसांनी सविता राठोड यांना आचार्य भगिनींनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचे निष्पन्न झाल्याने अॅट्रॉसिटी अॅक्ट खाली शनिवारी गुन्हा दाखल केला. अनुसूचित जाती जमाती अत्याचार विरोधी कायद्याखाली तिघींवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.(वार्ताहर)