लोकमत न्यूज नेटवर्कबिरवाडी : पोलादपूर शिवसेनेचे शहर प्रमुख सुरेश पवार यांचा पुतण्या रवींद्र पवार (३३) ला मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नागलवाडी फाटा येथे आठ जणांनी मारहाण के ली. ही घटना रविवारी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास घडली.मुंबईकडून पोलादपूरकडे रवींद्र पवार (रा. पोलादपूर) ट्रक घेऊन येत असताना मुंबईकडून पोलादपूरच्या दिशेला जाणाऱ्या तवेरा चालकाने गाडी ट्रकसमोर आडवी उभी करून गाडीतील आठ तरु णांनी रवींद्र पवार याला लोखंडी टॉमीने मारहाण के ली. यात रवींद्र जखमी झाले असून स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन हल्लेखोरांना तवेरा गाडीसह महाड एम.आय.डी.सी. पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र या हल्लेखोरांमधील तीन तरु ण घटना स्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले, तर अटक करण्यात आलेल्या पाच तरु णांची चौकशी सुरु आहे.
शिवसेनेच्या पोलादपूर शहर प्रमुखाच्या पुतण्यावर हल्ला
By admin | Published: May 14, 2017 10:49 PM