रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेत दरोड्याचा प्रयत्न निष्फळ, सीसीटीव्हीत चोर कैद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 04:35 AM2017-10-31T04:35:55+5:302017-10-31T04:36:06+5:30
येथील रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नांदगाव शाखेमध्ये दरोडा टाकण्याचा प्रयत्न चोरट्यांनी के ला, मात्र प्रत्यक्षात हाती काहीच लागले नाही.मात्र चोरट्यांनी या बँकेचा संगणक संच घेऊन पलायन केले.
नांदगाव/ मुरुड : येथील रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नांदगाव शाखेमध्ये दरोडा टाकण्याचा प्रयत्न चोरट्यांनी के ला, मात्र प्रत्यक्षात हाती काहीच लागले नाही.मात्र चोरट्यांनी या बँकेचा संगणक संच घेऊन पलायन केले. मुरु ड पोलीस या चोरट्यांचा कसून शोध सुरु केला असून अलिबाग येथील फिंगर प्रिंट तज्ज्ञांची मदत सुद्धा घेण्यात आली आहे.
मुरु ड तालुक्यातील नांदगाव शाखेमध्ये मध्यरात्री शाखा व्यवस्थापक बसतात त्या बाजूच्या लोखंडी खिडकीचे गज कापून बँकेच्या आत प्रवेश केला. ज्या ठिकाणी बँकेची कॅश ठेवली जाते त्या ठिकाणचा दरवाजा तोडण्यासाठी या चोरट्यांनी आटोकाट प्रयत्न केले, परंतु प्रत्यक्षात तो निष्फळ ठरला. अखेर हा दरवाजा जाळण्याचा सुद्धा त्यांनी प्रयत्न केला, परंतु तेथील लॉक न उघडल्याने या चोरट्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले आहे. या चोरट्यांनी जाताना बँकेचा फक्त संगणक संच घेऊन पोबारा केला आहे. सकाळी बँक उघडण्याची वेळ होताच शाखा व्यवस्थापकाच्या हा प्रकार लक्षात येताच मुरु ड पोलिसांना हा प्रकार सांगण्यात येऊन तातडीने तपासाला सुरु वात झाली आहे.
याबाबत मुरु ड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर साळे यांनी चोरट्यांनी तिजोरी असणारा दरवाजा तोडण्यासाठी जोरदार प्रयत्न केला, परंतु त्यांना ते जमू शकलेले नाही. बँकेतून कोणत्याही प्रकारची रोख रक्कम गेलेली नाही असे साळे यांनी सांगितले.
सीसीटीव्हीत चोर कैद
बँकेचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत, मात्र नांदगाव ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही कॅमेºयात हे दोघे कैद झाले असून हाफ पॅन्टवरील व्यक्ती असल्याचे किशोर साळे यांनी सांगितले. या व्यक्ती याच गावातील असू शकतील असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.