मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अडथळे दूर करण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 12:36 AM2020-06-10T00:36:59+5:302020-06-10T00:37:13+5:30
कामाला सुरुवात : गंधारपले महामार्ग वाहतूक शाखा पोलीस पावसाळ्यासाठी सज्ज
दासगाव : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. यापुढे कोकणातील महामार्ग सुरळीत राहावा यासाठी महामार्ग वाहतूक पोलीस शाखा गंधारपले हे सज्ज झाले आहेत. पावसाळ्यात प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. महामार्गावर विविध कामांना सुरुवात करण्यात आली आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुसºया टप्प्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. दोन वर्षे झाली तरी अद्याप काम पूर्ण झाले नाही. यंदा बहुतेक काम पूर्ण होण्याची शक्यता असताना कोरोनामुळे गेले तीन महिने काम ठप्प झाले होते. सध्या काम सुरू असले तरी पावसाने हजेरी लावली आहे. तर कोरोनाच्या भीतीने मजूर आपल्या गावी गेला आहे. सध्या तरी इंदापूर ते पोलादपूर या टप्प्यातील मोठ्या प्रमाणात काम शिल्लक आहे. ज्या ठिकाणी महामार्गाचे काही प्रमाणात काम झाले आहे अशा अनेक ठिकाणी सुरुवातीच्या पावसातच अडथळे निर्माण झाले आहेत. चक्रीवादळामुळेदेखील महामार्गावर झाड कोसळून अडथळे निर्माण झाले. सध्याच्या परिस्थितीत महामार्गाचे सुरू असलेले महाड तालुक्यातील केंबुर्ली गाव हद्दीतील आणि नडगाव हद्दीतील कामे महामार्गाच्या वाहतुकीला मोठे अडथळे निर्माण करणारी आहेत. तसेच वहूर हद्दीमध्ये महामार्गावरच मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले आहे. हे अडथळे चार दिवसांत दूर झाले नाहीत तर पावसाळ्यात महामार्ग बंद पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे अनेक अडथळे महामार्ग वाहतूक पोलीस शाखा गंधारपले यांच्या समोर यंदाच्या पावसामध्ये आव्हानात्मक उभे राहिले आहेत. नडगाव या ठिकाणच्या पुलाचे काम सुरू आहे. मात्र, तो लवकर व्हावा यासाठीदेखील महामार्ग पोलीस ठेकेदार कंपनीकडे पाठपुरावा करत आहे.
चक्रीवादळात पडलेले झाड दहा मिनिटांत के ले बाजूला
१पुढे येणाºया पावसाळ्यात अनेक प्रसंगांना तोंड देण्यासाठी महामार्ग वाहतूक पोलीस शाखा गंधारपले यांनी कंबर कसली असून जेसीबी, झाडांना कापण्यासाठी कटर, रुग्णवाहिका अशा अत्यावश्यक सुविधा सज्ज ठेवल्या असल्याची माहिती महामार्ग वाहतूक शाखा गंधारपलेचे पोलीस उपनिरीक्षक वाय. एम. गायकवाड यांनी दिली.
२चक्रीवादळात माणगाव तालुक्यातील पाले या गाव हद्दीमध्ये महामार्गावरच मोठे झाड कोसळले मात्र, महामार्ग पोलिसांनी ते दहा मिनिटांत बाजूला करत वाहतूक सुरळीत केली. सध्या यांच्या हद्दीत महामार्गालगत कोसळलेली झाडे साफ करण्याचे कामदेखील सुरू असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.