कावळ्याला जीवदान देण्याचे प्रयत्न असफल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 11:32 PM2019-07-23T23:32:51+5:302019-07-23T23:32:57+5:30

कावळा हा आपल्या संस्कृतीमध्ये शापित म्हणून ओळखला जातो. त्यामुळे इतर पक्ष्यांप्रमाणे कावळा हा तसा मानवाकडून नेहमीच उपेक्षित राहिला.

 Attempts to deliver life to Kawal failed | कावळ्याला जीवदान देण्याचे प्रयत्न असफल

कावळ्याला जीवदान देण्याचे प्रयत्न असफल

Next

रोहा : कावळ्याला रस्त्यात जखमी अवस्थेत तडफडताना पाहून त्याला जीवदान देण्याचा प्रयत्न रोह्यात झाला. त्यासाठी अनेकांनी केलेले प्रयत्न जरी अखेरीस असफल ठरले असले तरी या उल्लेखनीय मदतकार्याबद्दल नागरिकांमधून कौतुक होत आहे.

कावळा हा आपल्या संस्कृतीमध्ये शापित म्हणून ओळखला जातो. त्यामुळे इतर पक्ष्यांप्रमाणे कावळा हा तसा मानवाकडून नेहमीच उपेक्षित राहिला. अशाच दुर्लक्षित जखमी कावळ्याला वाचवण्याचे प्रयत्न रोह्यात करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र जाधव हे सकाळी नेहमीप्रमाणे रोह्यात येत असताना जखमी कावळा रस्त्यात फडफडताना दिसला. कावळा जिवंत असल्याचे समजताच त्याला शेजारील पंचायत समितीच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात नेले. त्या ठिकाणी लगेचच डॉ. एम. के. पटेल यांनी त्या जखमी कावळ्यावर तातडीने उपचार सुरू केले. मात्र, मोठ्या प्रमाणात विद्युत प्रवाहाचा झटका लागल्यामुळे उपचार सुरू असतानाच हा कावळा मृत्युमुखी पडला. यामुळे कावळ्याला जीवदान देण्याचे सर्वांचे प्रयत्न अखेर असफलच ठरले. अखेर उपचार करूनही मृत्यू झालेल्या या कावळ्याला उघड्यावर न टाकता पंचायत समिती कार्यालयाच्या परिसरात अंत्यसंस्कार केले व उपचारार्थ अपयश आल्याची खंत सर्वांच्या चेहऱ्यावर दिसून आली. या सर्व मदतकार्यात के. डी. देशमुख, शिपाई एम. पी. चोरगे, प्रशांत भगत व पक्षिप्रेमींचा सहभाग होता. रोहा शहर व परिसरात या वेगळ्या व उल्लेखनीय मदतकार्याबद्दल नागरिकांमधून कौतुक होत आहे.

Web Title:  Attempts to deliver life to Kawal failed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.