पनवेलमध्ये गौरागणेशोत्सवात लालबागच्या राजाचे आकर्षण, बाप्पाच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 05:20 AM2017-09-10T05:20:23+5:302017-09-10T05:20:31+5:30
अनंतचतुर्दशीला गणरायास भावपूर्ण निरोप दिल्यानंतर शनिवारी संकष्टीला पनवेलसह रायगडमध्ये गौरागणपतीचे उसाहात आगमन झाले. या वेळी सार्वजनिक व घरगुती गौरागणेशाची स्थापना मोठ्या प्रमाणात करण्यात आली
पनवेल : अनंतचतुर्दशीला गणरायास भावपूर्ण निरोप दिल्यानंतर शनिवारी संकष्टीला पनवेलसह रायगडमध्ये गौरागणपतीचे उसाहात आगमन झाले. या वेळी सार्वजनिक व घरगुती गौरागणेशाची स्थापना मोठ्या प्रमाणात करण्यात आली असून, लालबागच्या राजाची हुबेहूब प्रतिकृती ही गौरागणेश उत्सवाचे विशेष आकर्षण ठरले आहे. ज्या भाविकांना मुंबईला जाऊन लालबागच्या राजाचे दर्शन घेता येत नाही, असे भक्त आवर्जून पनवेलमधील या बाप्पाचे दर्शन घेतात.
व्यापारी, दुकानदार, मूर्तिकार हे दहा दिवसांच्या गणोशोत्सवात मोठ्या प्रमाणात व्यस्त असतात. त्या काळात त्यांना बाप्पाची सेवा करता येत नाही. या पार्श्वभूमीवर गौरागणपती बसविण्याची प्रथा सुरू झाली. ती अव्याहतपणे चालू आहे. या बाप्पाला ‘साखरचौथी’चा गणेश म्हणूनही संबोधले जाते. पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात हा बाप्पा सार्वजनिक स्वरूपात विराजमान होतो. यामध्ये छोटे-मोठे व्यावसायिक उत्साहाने सहभागी होतात.
प् गुळसुंदे गावात गणरायाची गेल्या अनेक वर्षांपासून मरिआई मंदिरात प्रतिष्ठापना केली जाते. जिल्ह्यातही काही ठिकाणी गौरागणपती विराजमान केला जातो. दीड दिवसांच्या मुक्कामासाठी या बाप्पाचे आगमन होत आहे. पनवेलमध्ये महात्मा फुले हातगाडी संघटनेच्या वतीने येथील बाजारपेठ परिसरात गौरागणेशाची स्थापना करण्यात येते. नजीकच्या काळात घरगुती गौरागणपतीची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पनवेल महापालिका हद्दीत सार्वजनिक व घरगुती गौरागणेशाची संख्या जवळ जवळ २२५ इतकी असून रविवारी सायंकाळी विसर्जन करण्यात येणार आहे.
कांबे येथे साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात
मोहोपाडा : कांबे येथील वारकरी सांप्रदायातील विघ्नहर्ता मित्रमंडळाच्या वतीने एकाटघर कांबे येथे चतुर्थीपासून साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात साजरा करीत आहेत. या वेळी म्हात्रे कुटुंबीय अडीच दिवस विविध सामाजिक कार्यक्र म साजरा करीत असतात. पारंपरिक नृत्याबरोबरच सांघिक खेळही या वेळी घेतले जातात.
सामाजिक बांधिलकी जपणारा गडबचा मंगलमूर्ती
वडखळ : सर्व सभासदांची एकजूट ग्रामस्थ व महिलांची साथ, सभासदांचा एकमेकांवरील विश्वास, श्री गणेशावरील अतुट भक्ती व सामाजिक बांधिलकी जपणारा गडब-जांभेळा येथील मरु देवी मंदिराच्या प्रांगणात मंगलमूर्ती मित्रमंडळ गडब या मंडळाकडून गेली पाच वर्षे साखरचौथ गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. या पुढेही हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करणार असल्याचा विश्वास, मंडळाचे सदस्य व्यक्त करीत आहेत.
साखरचौथ गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा
रेवदंडा : रेवदंडा मित्रमंडळातर्फे साखरचौथ गणेशमूर्तीची उत्साहात प्राणप्रतिष्ठापना बहिरी मंदिरासमोर दर्शनी भागात केली आहे. सकाळी धार्मिक विधी करण्यात आले. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्र मांचे आयोजन मंडळाने केले आहे. पंचक्र ोशीतील ग्रामस्थ या गणेशमूर्तीला रेवदंड्याचा राजा असे ओळखतात. मूर्ती अतिशय देखणी चैतन्यरूपी असून, भक्तमंडळींनी दर्शनासाठी गर्दी केली आहे.