शिवकालीन शस्त्र साधना करणारा अवलिया

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 11:28 PM2019-12-31T23:28:04+5:302019-12-31T23:28:15+5:30

विविध शस्त्रांचा संग्रह; शैलेंद्र ठाकूर करताहेत युद्धकलेचे जतन

Avalia, a practitioner of Shiva's time | शिवकालीन शस्त्र साधना करणारा अवलिया

शिवकालीन शस्त्र साधना करणारा अवलिया

Next

- संतोष सापते 

श्रीवर्धन : व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण त्यांच्या कृतीशील व नियमीत साधनेतून होत असते. आचार, विचार, संगत, ध्येय, स्वप्न आणि ध्यास व्यक्तीच्या आयुष्याला कलाटणी देतात. रायगड हा शिवछत्रपतीच्या राजधानीचा जिल्हा होय. त्याच जिल्ह्यात शिवकालीन युद्ध कला व शिवकालीन शस्त्र लुप्त होतांना दिसत आहेत. तेंव्हा प्राचीन ठेवा जतन करण्यासाठी श्रीवर्धनमधील शैलेंद्र ठाकूर या तरुणाने गेल्या १० वर्षात अथक परिश्रम करून विविध शिवकालीन शस्त्र जमा केले. तलवार, भाला, दांडपट्टा, ढाल, विटा, बाणा अशा शस्त्रांचा संग्रह केला त्यांनी के ला आहे. काही शस्त्र नव्याने तयार करून घेतली असल्याचे ठाकूर यांनी ‘लोकमशी’ बोलताना सांगितले.

शैलेंद्र ठाकूर हे नाव श्रीवर्धनमधील सामाजिक कार्यात अग्रणी असे आहे. कराटे, मल्लखांब व शिवकालीन युद्ध कलेच्या प्रशिक्षणा व्यतिरिक्त उदरनिर्वाहासाठी विक्रम रिक्षा चालवण्याचे काम ठाकूर करतात. शिवचरित्रावर असलेल्या प्रेमातून शिवकालीन शस्त्र जमा करण्याचा छंद ठाकूरांना जडला. शस्त्र जमा करत असताना ती कशी चालवावी या जिज्ञासे पोटी ठाकूर यांनी तालुक्यातील असंख्य जेष्ठ नागरिकांच्या भेटी घेत त्यांच्याकडून शिवकालीन युद्ध कले विषयी जाणून घेतले. शैलेंद्र कराटे प्रशिक्षक असल्याने त्यांनी या युद्ध कलेचे ज्ञान तात्काळ आत्मसात केले. आज त्या कलेचा उपयोग तालुक्यातील विविध तरुणांना होत आहे. श्रीवर्धनमध्ये होणारी शिवजयंती, गणेश उत्सव व विविध उपक्रमात शिवकालीन युद्ध कलेचे प्रत्याक्षिक शैलेंद्र दाखवतात.

या पूर्वी श्रीवर्धनमध्ये शिवकालीन खेळासाठी बाहेरील जिल्ह्यातील व्यक्तींना आमंत्रित केले जात. त्या वेळी आपण ही अशी शस्त्र चालविण्याची कला आत्मसात करावी असे ठाकूर यांनी वाटत असे. २००५ पासून ठाकूर यांनी शस्त्रसंग्रह सुरू केला होता. घरची परिस्थिती तशी बेताची असताना शस्त्र खरेदीसाठी पैसे उपलब्ध होणे जवळपास अशक्य होते तरी सुद्धा एका वेड्या छंदासाठी ठाकूर यांनी काटकसर करत शस्त्र जमा केली व ती शस्त्र चालविण्याचे ज्ञान सुद्धा आत्मसात केले. शैलेंद्र यांचे शिक्षण अवघे इयत्ता १० पर्यंत झाले आहे. घरात आई वडील, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. घरची शेती सांभाळत शिवकालीन युद्ध कलेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी ठाकूर प्रयत्नशील आहेत.

सर्पमित्र म्हणून काम
शस्त्रांच्या माहितीसाठी ठाकूर यांनी सातारा, पुणे, मुंबई, कोल्हापूर अशा विविध शहरात भ्रमंती केली. तरुण वर्गात इतिहासा विषयी प्रेम निर्माण व्हावे.
आपल्या पूर्वजांनी केलेल्या पराक्रमातून तरुणाईने बोध घ्यावा. आपल्या संस्कृतीचे संवर्धन व्हावे, तरुणांनी पुन्हा एकदा मैदानी खेळाकडे वळून बलदंड शरीरयष्टी बनवावी असे शैलेंद्र ठाकूर यांना वाटते.
शैलेंद्र ठाकुर यांनी युद्ध कले व्यतिरिक्त इतर ही छंदाची जोपासना केली आहे, ते श्रीवर्धनमध्ये सर्पमित्र म्हणून अनेक वर्षांपासून काम करत आहेत. अभिनव भारत संघ, वी नेचर फ्रेंड या तरुणांच्या संघटनेचे ते सभासद आहेत.

मी शिव छत्रपती शिवाजी महाराज यांचा भक्त आहे. त्यांच्या वरील श्रद्धेतून मी शिवकालीन युद्ध कलेचा अभ्यास केला व तत्कालीन काळातील शस्त्र जमा केली. यासाठी बराच संघर्ष करावा लागला. भावी काळात श्रीवर्धन तालुक्यातील मुलांच्यासाठी शिवकालीन युद्ध कलेचा आखाडा सुरू करणार आहे. मल्लखांब व इतर मैदानी खेळात मुलांना तरबेज करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
- शैलेंद्र ठाकूर

Web Title: Avalia, a practitioner of Shiva's time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.