जिल्ह्यात सरासरी 84 टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 01:06 AM2021-01-16T01:06:13+5:302021-01-16T01:06:26+5:30
७८ ग्रामपंचायतींसाठी ६१४ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
रायगड : जिल्ह्यातील ७८ ग्रामपंचायतींसाठी सरासरी ८४ टक्के मतदान झाले. ३०२ मतदान केंद्रांवर शुक्रवारी सकाळी साडेसात वाजेपासून मतदान प्रक्रियेला प्रारंभ झाला. ६१४ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रामध्ये बंद झाले आहे. १८ जानेवारी राेजी मतमाेजणी हाेणार असल्याने उमेदवारांची धाकधूक पुढील दाेन दिवस कायम राहणार आहे.
शुक्रवारी सकाळी साडेसात वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. कोरोना नियमांचे पालन करून मतदारांना मतदानासाठी मतदान कक्षात प्रवेश देण्यात येत हाेता. सुरुवातीला सकाळी मतदान केंद्रांवर तुरळक गर्दी पाहायला मिळाली. त्यानंतर गर्दी वाढत हाेती. दुपारी पुन्हा मतदारांनी ब्रेक घेतला. नंतर पुन्हा मतदानाला प्रारंभ झाला. पेझारी ग्रामपंचायतीमध्ये मतदान यंत्रात बिघाड झाल्याने परस्पर दाेघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. पाेलिसांनी हस्तक्षेप करीत वाद मिटविला. मतदान यंत्रातील बिघाडही दूर करण्यात आला, तसेच काही ठिकाणी मतदान यंत्रांमध्येही बिघाड झाले हाेते. तेथे तातडीने नवीन मतदान यंत्रे देण्यात आली असल्याचे उपजिल्हाधिकारी सर्जेराव म्हस्के-पाटील यांनी सांगितले. सकाळी साडेसात ते साडेनऊ या कालावधीत १४.८० टक्के मतदान झाले हाेते. साडेसात ते साडेअकरा ३५.१२ टक्के, साडेसात ते दीड वाजेपर्यंत ५४.३५ टक्के मतदान झाले, तर साडेसात ते साडेतीन या कालावधीत ६८.०५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ६१२ जागांसाठी १ हजार ५८८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदाराने मास्क लावले नसेल तर त्याला कक्षात सोडले जात नव्हते. प्रत्येक मतदाराचे शारीरिक तापमान, ऑक्सिजनची क्षमता तपासली जात होती. मतदान केंद्राबाहेर सॅनिटायझरही ठेवण्यात आले होते. पेणमध्ये सात ग्रामपंचायतीसाठी ६७ ११ हजार ११,८३८ मतदारांनी मतदान केले. दुपारी ४ वाजेपर्यत ७७ टक्के मतदान झाले.
कर्जतमध्ये ८७ टक्के मतदान
n कर्जत : तालुक्यातील हुमगाव ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने उर्वरित ८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान झाले. तालुक्यात १७ उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने आता ७१ जागांसाठी १६४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
n बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये सरळ सामना अपेक्षित आहे. शुक्रवारी सकाळी बहुतांश मतदान केंद्रांवर मतदारांनी गर्दी केली होती. मात्र, यावेळी सोशल डिस्टसिंगचे तीनतेरा वाजल्याचे पाहायला मिळाले. ग्रामपंचायतीसाठी सरासरी ८७ टक्के मतदान झाले असून, १८ तारखेला मतमोजणी होणार आहे.
n तालुक्यात कोल्हारे, जिते, पोशिर, साळोख तर्फ वरेडी, हुमगाव, कडाव, वैजनाथ, भिवपुरी, आणि दामत या नऊ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यापैकी हुमगाव ग्रामपंचायत बिनविरोध झाली.
n कोल्हारे ग्रामपंचायतींमध्ये रुक्मिणी हिलाल या ९२ वर्षांच्या आजींनी मतदान केले. मतदारांनी मास्क लावले होते परंतु सोशल डिस्टसिंगचे तीन - तेरा उडाले होते.