अलिबाग : दी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन लि., मुंबई यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट जिल्हा सहकारी बँक या श्रेणीमधून बँकिंग क्षेत्रामधील सन्मानाचा प्रथम क्र मांकाचा कै.वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुरस्कार रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सातव्यांदा जाहीर झाला आहे. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक यांना सर्वोकृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कै. बापूरावजी देशमुख उत्कृष्ट सहकारी बँक कर्मचारी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रेणीमधून त्यांची निवड करण्यात आली आहे. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही सातव्यांदा या पुरस्काराची मानकरी ठरणारी महाराष्ट्रातील पहिली बँक ठरली आहे. आर्थिक वर्ष २०१४-१५ मध्ये जिल्हा सहकारी बँकांमध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल बँकेला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याच वर्षी बँकेला राज्यस्तरीय बँको पुरस्काराने सलग तिसऱ्यांदा सन्मानित करण्यात आले होते, तर बँकेला देशपातळीवरील ५५० जिल्हा बँकांच्या नामांकनामधून तीन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. गतवर्षी बंगलोर येथे पार पडलेल्या पुरस्कार सोहळ्यात रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला पाच राष्ट्रीय पुरस्कार मिळाले असून, बँकेला महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘सहकारनिष्ठ’ आणि ‘सहकारभूषण’ पुरस्कारने सन्मानित केले आहे. गतवर्षी बँकेने २,७०० कोटींचा टप्पा ओलांडला असून, रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लोकांना आधुनिक बँकिंग सेवा द्यायला सुरु वात केली