शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना कोणाची? ठाकरे-शिंदे गट एवढ्या मतदारसंघांत थेट भिडणार; कुठे कुठे लढाई ठरली...
2
मोठा खेळ झाला! माजी आमदार एक मिनिट लेट झाले, निवडणुकीचा अर्ज भरण्यास मुकले
3
अजित पवार गटाच्या बंडखोरीविरोधात शिंदेंची खेळी, या उमेदवारांना थेट हेलिकॉप्टरने पाठवले ए-बी फॉर्म
4
एका दिवसात ६६,९२,५३५% रिटर्न, 'हा' बनला भारतीय बाजारातील सर्वात महागडा स्टॉक; MRF ला टाकलं मागे
5
"...तेव्हा आपोआप हिंदू-मुस्लीम एक्य होईल!"; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी CM योगींना सांगितला फॉर्मूला
6
Narak Chaturdashi 2024: नरक चतुर्दशीला सूर्योदयापूर्वी स्नान करा, नाहीतर नरकात जावे लागेल; वाचा महत्त्व!
7
"२ कोटी द्या अन्यथा..."; सलमान खानला पुन्हा धमकी! अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
8
दिवसभर नॉट रिचेबल असलेले श्रीनिवास वनगा रात्री उशिरा घरी परतले, पण...
9
राज्यात तब्बल ७,९९५ उमेदवार, सर्वच पक्षांत बंडखोरही भारंभार, १०,९०५ उमेदवारी अर्ज दाखल
10
धनत्रयोदशीला भारतीयांची जोरदार खरेदी; ₹२०००० कोटींचं सोनं, ₹२५०० कोटींच्या चांदीची विक्री
11
IND vs NZ: मुंबईत गेली १२ वर्ष भारत अजिंक्य! शेवटचा विजय न्यूझीलंडविरूद्धच... पाहा आकडेवारी
12
अजित दादांचा आरोप, आर आर पाटलांची सही, माझा बळी अन्...; पृथ्वीराज चव्हाण यांनी सगळंच सांगितलं!
13
Stock Market: मंगळवारच्या तेजीनंतर शेअर बाजाराची आज घसरणीसह सुरुवात, Sensex ३०० अंकांनी आपटला
14
"हा निर्णय कठीण होता, पण...", सई ताम्हणकरने अनिश जोगसोबत ब्रेकअप झाल्याची दिली कबुली
15
घर फोडायचे पाप आई-वडिलांनी शिकवले नाही; शरद पवार यांची अजित पवार यांच्यावर टीका
16
मुलांच्या भविष्याची चिंता आहे तर, या फॉर्म्युलानं सुरू करा गुंतवणूक; १८ व्या वर्षी मूल बनेल कोट्यधीश
17
आजचे राशीभविष्य: ७ राशींना आनंदी दिवस, लाभाचे योग; कार्यात यश, चांगली बातमी मिळेल
18
वडेट्टीवार, मुनगंटीवार, धानोरकरांची प्रतिष्ठा; महायुती व महाविकास आघाडीत लढत
19
शुक्रवारी लक्ष्मीपूजन: ८ राशींना अनुकूल, धनलाभाचे योग; धनलक्ष्मी प्रसन्न होईल, वरदान काळ!
20
पोलिस-वकिलांमध्ये कोर्टातच हाणामारी; ११ वकील जखमी, पोलिस ठाण्याला आग

शस्त्रक्रियेच्या परवानगीने आयुर्वेदिक-ॲलाेपॅथी डाॅक्टर आमने-सामने

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 2:36 AM

आयुर्वेद डाॅक्टरांना २८ प्रकारांच्या शस्त्रक्रिया करण्याचा कायदा केंद्र सरकारने आणला आहे. आयुर्वेद जगतातून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत असले, तरी दुसरीकडे मात्र ॲलाेपॅथी डाॅक्टरांनी या निर्णयाला कडाडून विराेध केल्याचे चित्र आहे.

- आविष्कार देसाईरायगड : आयुर्वेद डाॅक्टरांना २८ प्रकारांच्या शस्त्रक्रिया करण्याचा कायदा केंद्र सरकारने आणला आहे. आयुर्वेद जगतातून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत असले, तरी दुसरीकडे मात्र ॲलाेपॅथी डाॅक्टरांनी या निर्णयाला कडाडून विराेध केल्याचे चित्र आहे.आयुर्वेदामध्ये एमएस, एमडी अशी पदवी संपादन केलेल्या आयुर्वेदिक डाॅक्टरांना शस्त्रक्रिया करण्याची परवानगी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे आराेग्य व्यवस्थेमध्ये या निर्णयाबाबत उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. आयुर्वेद उपचार पद्धतीतील डाॅक्टरांनी या निर्णयाचे जाेरदार स्वागत केले आहे. सरकारने निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आयुर्वेदातील क्रांतिकारी पाऊल ठरणार असल्याचा दावा केला जात आहे, तर दुसरीकडे सरकारने या निर्णय घेऊन फार माेठी चूक केली आहे. या चुकीची किंमत थेट रुग्णांच्या जिवाशी खेळून चुकती करावी लागणार आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया ॲलाेपॅथी प्रक्टिशनर डाॅक्टरांच्या संघटनांनी केला आहे. सरकारने घेतलेला निर्णय चांगला अथवा वाईट हे कळण्यासाठी थाेडा अवधी जाणार आहे, एवढे मात्र निश्चित आहे. आयुर्वेद डॉक्टरांकडून निर्णयाचे स्वागतशल्यकर्माचे जनक म्हणून सुश्रुताचार्य जगत मान्य आहेत. सुश्रुताचार्यांनी ११२ प्रकारची शल्यकर्म शस्त्रे, शिवण, बंध सांगितले आहेत. याचा फायदा रुग्णांना तर हाेणारच आहे, आराेग्य व्यवस्थेवरचा ताण कमी हाेणार आहे. या निर्णयाचे स्वागत केले पाहिजे.     -डाॅ. अमेय केळकर,            एमडी,आयुर्वेद सरकारने सरसकट शस्त्रक्रिया करण्याला आयुर्वेदिक डाॅक्टरांना परवानगी दिली नाही, ही गाेष्ट लक्षात घेतली पाहिजे. ज्याचा यातील अभ्यासक्रम पूर्ण झालेला आहे, त्यांच्यासाठी आहे.  -डाॅ. आर्चिस पाटील, एमडी, आयुर्वेद सरकारने घेतलेल्याा निर्णयाचे आम्ही स्वागत करताे. आयुर्वेदाबाबत काही उलटसुलट पसरविले जात आहे, ते चुकीचे आहे. आयुर्वेदातील एमएस, एमडी यांना शस्त्रक्रियेची परवानगी दिलेली आहे. - डाॅ. सारीका पाटील, आयुर्वेदाचार्य ॲलोपॅथी डॉक्टरांचा    निर्णयाला विरोध अधिसूचनेचा सर्वप्रथम आम्ही निषेध करताे. सरकारने आयुर्वेदिक डाॅक्टरांना शस्त्रक्रियेची परवानगी दिली आहे, त्याचा विराेध करण्यात येत आहे. आधुनिक शस्त्रक्रियांना संस्कृत नाव देऊन आयुर्वेदिकच शस्त्रक्रिया आहेत, अशी दिशाभूल केली जात आहे. यामुळे रुग्णांचीही दिशाभूल हाेते. - राजेंद्र चांदाेरकर, आयएमए, अध्यक्ष सरकारने आयुर्वेदिक डाॅक्टरांना शस्त्रक्रियेची परवानगी देणे हा रुग्णांच्या जिवाशी खेळ आहे. आयुर्वेदिक डाॅक्टरांना शस्त्रक्रियेचे परिपूर्ण ज्ञान अवगत नसल्याने ते धाेकादायक ठरू शकते.- डाॅ. विनायक पाटील, बालराेग तज्ज्ञ सरकारने आयुर्वेदिक डाॅक्टरांना परवानगी दिली आहे, हा अत्यंत चुकीचा निर्णय आहे. शस्त्रक्रियेबाबत त्यांना परिपूर्ण ज्ञान नसल्याने ते रुग्णांसाठी धाेकादायक आहे. -डाॅ. सतिश विश्र्वेकर, अर्थाेपिडीक, सर्जन  

नवीन कायद्याचा रुग्णांना फायदा पदव्युत्तर शल्यचिकित्सकांमुळे शल्यकर्मांना एक नवीन आयुर्वेदिक आयाम मिळेल अनेक रोगांच्या अवस्थांमध्ये शल्यक्रमांना आयुर्वेदिक औषध चिकित्सेचा पर्याय मिळेल. त्याचप्रमाणे, ग्रामीण भागातील रुग्णांना याचा विशेष फायदा हाेणार आहे. आराेग्य व्यवस्थेवरील ताण कमी हाेणार आहे. सरकारच्या नवीन कायद्याचा ताेटासरकारने आयुर्वेदिक डाॅक्टरांना शस्त्रक्रियेची परवानगी दिल्याने रुग्णांच्या जिवाशी खेळ हाेणार आहे. आयुर्वेदिक डाॅक्टर यांना शस्त्रक्रियेचे ट्रेनिंग नाही, तसेच शस्त्रक्रियेमध्ये प्रामुख्याने ॲलाेपॅथीची औषधे वापरली जातात. त्यामुळे रुग्ण दगावल्यास जबाबदार काेण, असा प्रश्न आहे. ग्रामीण भागातील नागरिक याला बळी पडण्याचा धाेका आहे.

टॅग्स :docterडॉक्टरMedicalवैद्यकीय