बांधकाम व्यावसायिकांनी बुजवले नैसर्गिक नाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 02:11 AM2017-07-30T02:11:12+5:302017-07-30T02:11:12+5:30

नेरळ विकास प्राधिकरणाच्या हद्दीत नव्याने होत असलेल्या बांधकामामुळे पाण्याचा निचरा होत नसून रस्ते जलमय झाले होते. त्यामुळे सर्व प्रकरणात रायगड जिल्हा परिषदेने

baandhakaama-vayaavasaayaikaannai-baujavalae-naaisaragaika-naalae | बांधकाम व्यावसायिकांनी बुजवले नैसर्गिक नाले

बांधकाम व्यावसायिकांनी बुजवले नैसर्गिक नाले

googlenewsNext

कर्जत : नेरळ विकास प्राधिकरणाच्या हद्दीत नव्याने होत असलेल्या बांधकामामुळे पाण्याचा निचरा होत नसून रस्ते जलमय झाले होते. त्यामुळे सर्व प्रकरणात रायगड जिल्हा परिषदेने लक्ष घालावे, अशी मागणी कोल्हारे ग्रामपंचायतीकडून करण्यात आली होती. जिल्हा परिषदेने पाठविलेल्या समितीने कोल्हारे आणि धामोते भागात पाहणी केली आहे. त्यानुसार नैसर्गिक नाले अडविणाºया बांधकाम व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.
नेरळ, ममदापूर आणि कोल्हारे या तीन ग्रामपंचायती यांचे मिळून नेरळ विकास प्राधिकरण बनविले आहे. पुणे येथील नगररचना विभाग आणि शासनाचा नगरविकास विभाग यांनी प्राधिकरण बनविले होते. धामोते आणि कोल्हारे हद्दीत प्राधिकरणाने बांधकाम व्यावसायिकांना इमारती, टॉवर बांधण्यासाठी परवानगी दिली होती. मात्र बांधकाम व्यावसायिकांनी नैसर्गिक नालेच बंद केल्याने पाण्याचा निचराच होत नाही. त्यामुळे पहिल्याच पावसात नेरळ-कळंब रस्ता पाण्याखाली जाऊन राज्यमार्ग दर्जाचा रस्ता बंद झाला होता. एक तास पाऊस पडला तरी रस्त्यावरून पाणी जात असल्याने संपूर्ण परिसर पाण्याखाली जातो. स्थानिक सदस्या वंदना पेरणे यांनी ग्रामपंचायतीकडे तक्रार केल्यानंतर, धामोते भागातील बिल्डरला कोल्हारे ग्रामपंचायतीने नोटीस बजावली होती. परंतु ग्रामपंचायतीचे बिल्डर ऐकत नसल्याने कोल्हारे ग्रामपंचायतीने रायगड जिल्हा परिषदेला या प्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली होती. या भागातून निवडून गेलेले सदस्य आणि जिल्हा परिषदेचे सभापती नारायण डामसे यांनी कोल्हारे ग्रामपंचायतीची बाजू ठामपणे मांडल्याने जिल्हा परिषदेच्या एका समितीने आज नेरळ परिसराची पाहणी केली. डामसे यांच्यासह जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी खोपकर, कार्यकारी अभियंता बारदेशकर, नगरविकास विभागाचे तायडे यांच्यासह कर्जत पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, प्राधिकरणचे उपअभियंता सदानंद शिर्के, कोल्हारे ग्रामपंचायतीचे उपसरपंच राजेंद्र विरले तसेच सदस्य उपस्थित होते. समितीने प्राधिकरण हद्दीत सुरू असलेली बांधकामे आणि त्यासाठी करण्यात आलेला भराव, साठलेल्या पाण्याची पाहणी केली.

समिती आपला अहवाल रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर करणार असून ते सर्वसाधारण समितीपुढे ठेवणार आहेत. गेली चार दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला असला तरी परिसरात ठिकठिकाणी पाणी साचले आहे. याठिकाणी बांधकाम व्यावसायिकांनी मातीचा भराव केला आहे. त्यामुळे समितीकडून अहवाल सादर झाल्यावर कठोर कार्यवाही होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पाहणी दौºयानंतर आठ दिवसांत त्याची अंमलबजावणी झालेली दिसेल असे समितीमधील एका अधिकाºयाकडून सांगण्यात आले.

Web Title: baandhakaama-vayaavasaayaikaannai-baujavalae-naaisaragaika-naalae

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.