खराब हवामानाचा जहाजांना फटका; नाशवंत मालाचे नुकसान होण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 05:39 AM2024-07-19T05:39:44+5:302024-07-19T05:40:13+5:30

परिणामी होणाऱ्या विलंबामुळे नाशवंत मालाचे नुकसान होण्याची भीती व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

Bad weather hits ships Fear of loss of perishable goods | खराब हवामानाचा जहाजांना फटका; नाशवंत मालाचे नुकसान होण्याची भीती

खराब हवामानाचा जहाजांना फटका; नाशवंत मालाचे नुकसान होण्याची भीती

मधुकर ठाकूर

उरण : खराब हवामानाचा फटका जेएनपीए बंदरात मालवाहू करणाऱ्या जहाजांनाही बसल्याने ये-जा करताना विलंब होऊ लागला आहे. जहाजांच्या विलंबामुळे मात्र मागील ८ दिवसांपासून बंदरातील आयात-निर्यात मालाची वाहतूक काहीशी थंडावली आहे. यामुळे बंदराच्या प्रवेशद्वारापासून तीन-चार किलोमीटर अंतरापर्यंत कंटेनर मालाची वाहतूक करणाऱ्या ट्रेलरच्या रांगा लागल्या आहेत. परिणामी होणाऱ्या विलंबामुळे नाशवंत मालाचे नुकसान होण्याची भीती व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

 समुद्रातील खराब हवामानामुळे आणि काही तांत्रिक कारणांमुळे जेएनपीए बंदरात दाखल होणारी मालवाहू जहाजे २५ दिवसांवरून ४० दिवसांवर पोहोचला आहे. मालवाहू जहाजांना बंदरात दाखल होण्यासाठी होणाऱ्या विलंबामुळे मात्र, हजारो कंटेनर जेएनपीए बंदरांत पडून आहेत. परिणामी बाहेरून ये-जा करणाऱ्या कंटेनर वाहतुकीच्या ट्रेलर्सना जागाच उपलब्ध नाही. त्यामुळे कंटेनरच्या रांगा जेएनपीए प्रवेशद्वारापासून लागत आहेत. मागील आठ-दहा दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रकारामुळे जेएनपीए बंदरातील कंटेनर वाहतूक थंडावली आहे.

एक जहाज गेल्यानंतरच त्याठिकाणी दुसरे लागते. त्यामुळे बंदरातही जागा रिक्त होण्यास विलंब होत आहे. मात्र कामकाज काहीअंशी पूर्वपदावर आले आहे.

- एस. के. कुलकर्णी,

डीजीएम, जेएनपीए

Web Title: Bad weather hits ships Fear of loss of perishable goods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.