दशावतारी कलेसाठी बालदशावतारांची धडपड

By admin | Published: December 31, 2016 09:57 PM2016-12-31T21:57:05+5:302016-12-31T21:57:05+5:30

आशेचा किरण : धार्मिक संस्कृतीचे शिक्षण, प्रबोधन करण्याचे काम

Baldashawatra struggle for Dashavatari art | दशावतारी कलेसाठी बालदशावतारांची धडपड

दशावतारी कलेसाठी बालदशावतारांची धडपड

Next

प्रथमेश गुरव --वेंगुर्ले --कोकणातील सांस्कृतिक क्षेत्रात महत्वाच्या मानल्या गेलेल्या दशावतार कलेत आता पौढच नाही तर युवकारांबरोबर लहान मुलेही हिरीरीने भाग घेऊन ही कला उत्तमरित्या सादर करीत आहेत. भविष्यात दशावतार कला जीवंत ठेवण्यासाठी आत्ताची बाल दशावतार मंडळे महत्वाची कामगिरी बजावणार असल्याने आशेचा किरण निर्माण झाला आहे.
दशावतार हा नाट्यप्रकार 700 ते 800 वषार्पूर्वी पासूनचा कोकणात रुढ झालेला आहे. त्या काळात मनोरंजनाचे साधन उपलब्ध नव्हते. त्यामुळे प्रामुख्याने समाज जागृती, समाजशिक्षण, धार्मिक संस्कृतीचे शिक्षण व प्रबोधन करण्याचे काम होत असे.
पुराणातील कथांच्याद्वारे दशावतार नाटज्निर्मिती करुन या लोककलेला अधिष्ठान प्राप्त करुन दिले. सत्य-असत्य याचा सुरेख मेळ घालून शेवटी सत्याचा विजय होते हे सूत्र प्रकषार्ने मनावर ठसविण्याचे काम या नाटज्प्रकारातून केले जात आहे. पूर्वी अशा नाटकांनी काम करणारे कलाकारही जवळ जवळ 30 वयोमानाच्या पुढचे दिसायचे. संगीत साथीलाही त्याच वयोमानाचे पुरुष. आणि दशावतार नाटकेही गावच्या जत्रोत्सवांपुरती मर्यादित असायची. पण त्यानंतर हळुहळू या दशावतारी नाटकांना चांंगले दिवस आले. जत्रोत्सवांबरोबरच गावातील लहान - मोठज कार्यक्रमांना दशावतार नाटके ठेवली जाऊ लागली आणि ही नाटके सायंकाळी 7 ची असल्याने जागरण न जमणा-या रसिकांनी याचा आस्वाद घेता येऊ लागला. त्यामुळे या कलेला भरपूर प्रतिसाद मिळाला. लहान मुलेही या नाटकांना जाऊ लागली. परिणामी त्यांच्यातही या नाटकाची आवड निर्माण झाली.
अलिकडे शालेय कार्यक्रमात अशी नाटके बसवून त्यात लहान मुलांना सहभागी करुन घेतले जात आहे. अणसूर येथील एका शाळेने बसविलेले भोमासूर वध हे नाटक तर अव्वल ठरले. परंतु काही शाळांमधील मुले ही कला एका विशिष्टच कार्यक्रमापुरती सादर करीत असल्याने त्या मुलांमधील कला ही त्याच भागापुरती मर्यादित राहिली.
लहान मुलांची ही पंचक्रोशीतील लोकांना समजावी यासाठी वेंगुर्ले शहरातील तसेच ग्रामीण भागातील अशा मुलांना एकत्र करुन श्री रामेभर बाल दशावतार नाटज् कंपनीही काढण्यात आली. गेली तीन वर्षे या कंपनीची वेंगुर्ले, दाभोली, नाणोशी, तिरोडा, गवंडीवाडा अशा ठिकाणी नाटज्प्रयोग सादर झाले आहेत. पंचक्रोशीत विविध ठिकाणी नाटक केल्याने मुलांच्या कलेला प्रोत्साहन मिळाले. अशाप्रकारे ठिकठिकाणी स्थानिक लोकांनी, मुलांच्या पालकांनी पुढाकार घेऊन आपल्या मुलांचा सहभाग असलेली नाटज् मंडळे निर्माण केली. दरम्यान, ही लोककला वृद्धींगत होण्यासाठी तसेच उत्कृष्ट कलाकार होण्याच्यादृष्टीने मुलांमध्ये चांगला बदल व्हावा यासाठी खानोली-सुरंगपाणी येथे 15 ते 25 वयोगटातील मुलांची दशावतारी नाटज् स्पर्धा घेण्यात आली. याला उर्त्स्फूत प्रतिसादही लाभला. यात 15 वयोगटापेक्षाही कमी वयाच्या मुलांनी सहभाग घेत आपली कला सादर केली. एवढज लहान वयात पुराणातील कथा सर्वांसमोर सादर करण्याची कला ही मुले लिलया पार पाडीत आहेत. अशाप्रकारच्या स्पर्धा दरवर्षी झाल्यास या मुलांना एक चांगले व्यासपिठ मिळणार आहे. त्यामुळे भविष्यात दशावतार कला लोप न पावता ती अधिकाधिक वाढत जाणार आहे यात शंकाच नाही.

Web Title: Baldashawatra struggle for Dashavatari art

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.