Raigad Rain: बाळगंगा पुराच्या पाण्याने मुंबई-गाेवा महामार्ग बुडाला; रायगड जिल्ह्यात पाच जण वाहून गेले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 06:53 PM2021-07-19T18:53:00+5:302021-07-19T18:54:12+5:30

Raigad Rain update: पेणमध्ये तटरक्षक दलाला केले पाचारण; दाेन दिवसांपासून काेसळणाऱ्या पावसामुळे म्हसळा, कर्जत, पनवेल-पाेयंजे येथील तीघे जण तर खाेपाेली क्रांतीनगर येथील दाेन लहान मुले वाहून गेल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

Balganga floods on Mumbai-Goa highway; Five people drowned in Raigad district | Raigad Rain: बाळगंगा पुराच्या पाण्याने मुंबई-गाेवा महामार्ग बुडाला; रायगड जिल्ह्यात पाच जण वाहून गेले

Raigad Rain: बाळगंगा पुराच्या पाण्याने मुंबई-गाेवा महामार्ग बुडाला; रायगड जिल्ह्यात पाच जण वाहून गेले

googlenewsNext

लाेकमत न्यूज नेटवर्क
रायगड ः जिल्ह्यात गेल्या दाेन दिवसांपासून पावसाने चांगलेच थैमान घातले आहे. पेण तालुक्यात बाळगंगा नदीला आलेल्या पुराचे पाणी मुंबई-गाेवा या राष्ट्रीय महामार्गावर आल्याने महामार्ग पाण्याखाली गेला हाेता. त्यामुळे बराच कालावधीसाठी वाहतुक ठप्प झाली हाेती. पेण तालुक्यातील पुर परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारतीय तट रक्षक दलाच्या एका तुकडीला पाचारण करण्यात आले. (Heavy rain in Raigad District, 5 drowned.)

दाेन दिवसांपासून काेसळणाऱ्या पावसामुळे म्हसळा, कर्जत, पनवेल-पाेयंजे येथील तीघे जण तर खाेपाेली क्रांतीनगर येथील दाेन लहान मुले वाहून गेल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिकांच्या मदतीने प्रशासनाने शाेध कार्य हाती घेतले आहे. कर्जत येथील प्रमाेद जाेशी (26), पाेयंजे येथील दिपक ठाकूर (24) अशी वाहून गेलेल्यांची नावे आहेत, तर म्हसळा आणि क्रांतीनगर येथीन वाहून गेलेल्याची नावे समजू शकलेली नाहीत.
माथेरान मार्गावर भली माेठी दरड कोसळल्याने वाहतुक ठप्प झाली हाेती. स्थानिकांच्या मदतीने दरड हटवण्यात आली मात्र काही त्यामध्ये माेठे दगड असल्याने प्रशासनाने जेसीबीच्या सहयाने दरड हटवण्यास सुरुवात केली आहे. सायंकाळी उशिरापर्यंत दरड हटवण्याचे काम सुरु हाेते.

गेल्या 24 तासांमध्ये जिल्ह्यात तब्बल 186 मिमी पावसांची नाेंद झाली आहे. अतिवृष्टीमुळे आंबा, कुंडलीका, बाळगंगा नद्यांना पुर आला आहे. पुराचे पाणी घरात, रस्त्यावर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. माणगाव-माेर्बा,नेरळ-माथेरान या ठिकाणी दरड काेसळल्याने वाहतूक ठप्प झाली हाेती. दरड हटवण्याचे काम सुरु आहे. पनवेल तालुक्यातील 348 घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. अलिबाग, पेण, राेहा, तळा, माणगाव, म्हसळा, महाड या ठिकाणी काही प्रमाणात घरे आणि गाेठ्यांचे नुकसान झाले आहे. अलिबाग-रामराज गावातील घरांमध्ये पाणी शिरले हाेते. आंबेत-बांगमांडला येथील बायपास पुलावर पाणी आल्याने वाहतुक बंद करण्यात आली हाेती. नागाेठणे बस स्थानाकमध्येही पाणी भरल्याने वाहतुक ठप्प झाली हाेती. जिल्ह्याच्या काही भागांमध्ये विद्युत पुरवठाही खंडीत झाला हाेता. नेरळ-माथेरान मार्गावर भली माेठी दरड कोसळल्यानेवाहतुक ठप्प झाली हाेती. नेरळ पोलीस , नेरळ माथेरान टॅक्सी चालक-मालक संघटनेच्या चालकांनी रस्त्यावरील दरड बाजूला करत रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन मोठे दगड असल्याने जेसीबीच्या सहयाने दरड बाजूला करण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सायंकाळी उशिरापर्यंत करण्यात येत हाेते.


पांडवकडा परिसरात धोकादायक स्थिती असल्याने पावसाळ्यात येथे पर्यटकांना जाण्यास मज्जाव आहे. त्यात कोरोनामुळे बंदी आहे. ती झुगारून काहीजण रविवारी (18 जुलै) या ठिकाणी गेले होते. मात्र जास्त पर्जन्यवृष्टी झाल्याने संबंधित पर्यटक या ठिकाणी अडकले. ही माहिती मिळताच सिडको अग्निशमन दल आणि खारघर पोलिसांनी संबंधित पर्यटकांना सुखरूप पणे बाहेर काढले. 116 पर्यटकांमध्ये 78 महिला 5 मुले यांचा समावेश हाेता.         

Web Title: Balganga floods on Mumbai-Goa highway; Five people drowned in Raigad district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.