माथेरानच्या शार्लोट तलावावर बंदी
By Admin | Published: July 24, 2016 03:51 AM2016-07-24T03:51:39+5:302016-07-24T03:51:39+5:30
पावसाळा म्हटला सर्वांनाच वेध लागतात ते वर्षा सहलींचे. त्यामुळे सर्वांची पावले आपोआपच जवळचे धबधबे, नदी, धरणांकडे वळतात. परंतु अतिउत्साहामुळे अनेकांना जीव गमवावा
माथेरान : पावसाळा म्हटला सर्वांनाच वेध लागतात ते वर्षा सहलींचे. त्यामुळे सर्वांची पावले आपोआपच जवळचे धबधबे, नदी, धरणांकडे वळतात. परंतु अतिउत्साहामुळे अनेकांना जीव गमवावा लागल्याच्या घटना रसायनी, कर्जत, खालापूर परिसरात घडल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने कर्जत, खालापूर परिसरातील धरणांवर जाण्यास बंदी घातली आहे.
तालुक्यातील धरणे, धबधब्यांवर जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे. त्यामुळे तरुणाई वर्षा सहलीसाठी माथेरानकडे मोर्चा वळवीत आहेत. या ठिकाणी मोठे धबधबे नसले तरीसुद्धा शार्लोट तलावावर मनसोक्त भिजण्याचा आनंद पर्यटक घेत आहेत. मात्र अपघाताची शक्यता लक्षात घेऊन शार्लोट तलावावर पर्यटकांना प्रवेशबंदी घालण्यात आली आहे.