नववर्षानिमित्त मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहतुकीस बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 05:25 AM2017-12-27T05:25:17+5:302017-12-27T05:25:34+5:30
अलिबाग : रायगड जिल्ह्यात नववर्षानिमित्त जादा पर्यटक येण्याची शक्यता लक्षात घेता, येत्या २९ ते ३१ डिसेंबर (शुक्रवार ते रविवार)दरम्यान जिल्ह्यातील सर्व प्रमुख मार्गांवरील रहदारी सुरळीत ठेवून पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी तत्काळ उपाययोजना कराव्यात.
अलिबाग : रायगड जिल्ह्यात नववर्षानिमित्त जादा पर्यटक येण्याची शक्यता लक्षात घेता, येत्या २९ ते ३१ डिसेंबर (शुक्रवार ते रविवार)दरम्यान जिल्ह्यातील सर्व प्रमुख मार्गांवरील रहदारी सुरळीत ठेवून पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी तत्काळ उपाययोजना कराव्यात. या कालावधीत जिल्ह्यातून जाणाºया मुंबई-गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक बंद करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मंगळवारी येथे दिले.
रायगड जिल्ह्यात विविध पर्यटन स्थळांवर २३ ते २५ डिसेंबर या कालावधीत पर्यटकांचा ओघ वाढल्याची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी सर्व संबंधित विभागांची तत्काळ बैठक बोलावून पर्यटकांची गैरसोय होऊ नये यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी म्हणाले की, २९ डिसेंबरपासून पुन्हा पर्यटकांचा ओघ वाढण्याची शक्यता लक्षात घेता, महामार्गावरील अवजड वाहतूक ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवावी. त्याचे संपूर्ण नियोजन राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाºयांनी व वाहतूक पोलिसांनी करावे. वाहतूककोंडीस कारणीभूत ठरणारे खड्डे तत्काळ बुजवावेत. समुद्रकिनाºयावर सकाळी ७ ते रात्री १२ वाजेपर्यंत जीवरक्षकांची पथके तैनात करावीत आदी सूचना डॉ. सूर्यवंशी यांनी केल्या.
जिल्ह्यातील किल्ल्यांवरही मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. काही त्या ठिकाणी रात्री मुक्कामीही असतात. अशा सर्व प्रवाशांचे सामान तपासूनच त्यांना वर जाण्याची परवानगी देण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.