मुंबई : भांडवली मूल्यावर आधारित करप्रणाली 2क्1क् पूर्वलक्षी प्रभावाने मंजूर करणा:या सत्ताधा:यांकडूनच आता या करामध्ये 25 टक्के सूट देण्याची मागणी पुढे आली आह़े बँकांमध्ये असलेल्या ठेवी 36 हजार कोटींवर पोहोचल्याने ही सूट द्यावी, असा प्रस्ताव ठेवून मित्रपक्ष भाजपाने शिवसेनेला चांगलेच अडचणीत आणले आह़े त्यामुळे आतार्पयत विरोधकांनी उचलून धरलेल्या या मुद्दय़ावरून आता सत्ताधा:यांमध्येच जुंपण्याची चिन्हे आहेत़
पालिकेच्या तिजोरीतील धन विविध बँकांमध्ये ठेवींच्या स्वरूपात ठेवल्या आह़े पाच वर्षामध्ये या ठेवींनी किती कोटींचा आकडा गाठला आहे, याबाबत भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी प्रशासनाकडून माहिती मागविली होती़ त्यानुसार 36 हजार 762 ठेवी बँकांमध्ये असून, त्यावर दरवर्षी तीन हजार कोटींचे व्याज मिळत असल्याचे पालिकेच्या प्रमुख लेखापाल यांनी उत्तर दिले.
बँकांमध्ये कोटय़वधींच्या ठेवी असताना जल-मलनिस्सारण आकार व मालमत्तेची नवीन करप्रणाली मुंबईकरांवर लादणो अन्यायकारक असल्याचा साक्षात्कार भाजपाला झाला आह़े त्यामुळे गतवर्षी करवाढीच्या प्रस्तावांना मंजुरी दिल्याचा विसर पडत भाजपाने करसवलतीची मागणी केली आह़े भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी आयुक्त सीताराम कुंटे व महापौर सुनील प्रभू यांच्याकडे पत्रद्वारे ही मागणी केली आह़े (प्रतिनिधी)
2क्क्7 पासून आतार्पयत पालिकेने सातत्याने खर्चात कपात करून बँकांमधील ठेवी वाढविल्या आहेत़ आजच्या घडीला बँकांमध्ये पालिकेच्या 36 हजार 762 कोटींच्या ठेवी आहेत़ मालमत्ता, जल व मलनिस्सारण आकार व विकास कराच्या माध्यमातून पालिकेच्या तिजोरीत कोटय़वधींचे उत्पन्न जमा होत़े
प्रकाररक्कम
विशेष फंड24, 5क्1
ठेकेदारांकडील अनामत रक्कम4,239
जादा फंड8,127
च्बँकांमध्ये असलेल्या ठेवीमधील
73 टक्के रक्कम निवृत्तिवेतन व ग्रॅच्युटीपोटी कर्मचा:यांना देणो आहे, तर उर्वरित रक्कम विकासकामांसाठी तरतूद करण्यात आली असल्याची भूमिका स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी घेतली आह़े
च्परंतु मित्रपक्षानेच अशी मागणी केल्यामुळे अडचणीत आलेल्या शिवसेनेने यावर विचार करण्याची तयारी दाखविली आह़े याबाबत विचारले असता, गटनेत्यांच्या बैठकीत यावर योग्य निर्णय घेण्यात येईल, असे मोघम उत्तर फणसे यांनी दिल़े