बँके वर दरोडा टाकणारे अटकेत;२४ तासांत तिघे चोरटे गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 05:13 AM2017-11-01T05:13:03+5:302017-11-01T05:13:10+5:30
मुरु ड तालुक्यातील नांदगाव येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेवर दरोडा टाकू न चोरट्यांनी मुद्देमाल लंपास केला होता. परंतु नांदगाव ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही फुटेजमुळे आरोपींना २४ तासांत पकडण्यात मुरु ड पोलिसांना यश आले आहे.
नांदगाव/ मुरु ड : मुरु ड तालुक्यातील नांदगाव येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेवर दरोडा टाकू न चोरट्यांनी मुद्देमाल लंपास केला होता. परंतु नांदगाव ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही फुटेजमुळे आरोपींना २४ तासांत पकडण्यात मुरु ड पोलिसांना यश आले आहे. एका आरोपीची बारीक डोळ्याची ठेवण असल्यामुळे प्रथम त्याला ताब्यात घेण्यात येऊन मग इतर दोघांना वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक करण्यात आल्याची माहिती मुरु ड पोलिसांनी दिली. यातील तीनपैकी दोन आरोपी हे अल्पवयीन असल्याने त्यांचा खटला कर्जत येथील बालगुन्हेगार कोर्टात चालणार आहे.
नांदगाव येथील या बँकेत रविवारी पहाटे २.३०च्या दरम्यान नांदगाव येथील राहणारे सन्नी संदीप कंटक (१८ वर्षे पूर्ण) व त्याचे साथीदार निखिल लक्ष्मण कुमरोटकर, साहिल कुमरोटकर या तिघांनी मिळून नांदगाव शाखेत खिडकीची तावदाने तोडून आत प्रवेश केला होता. या बँकेची तिजोरी तोडण्यासाठी सोने वितळवण्यासाठी जो गॅस कटर वापरतात तो घेऊन या तिघांनी आत प्रवेश केला होता. तिजोरी गॅस कटरने तोडण्याचा प्रयत्न केला, परंतु उपयोग न झाल्याने हताश होऊन बँकेचा संगणक संच, सीसीटीव्हीचा डीव्हीआर युनिट आदी साहित्य घेऊन पोबारा केला होता.
याबाबत अधिक माहिती देताना पोलीस निरीक्षक किशोर साळे यांनी सांगितले की, नांदगाव ग्रामपंचायतीमध्ये दोन सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, परंतु या चोरट्यांना दर्शनी भागात असणारा कॅमेराच दिसला याच कॅमेºयावर लक्ष ठेवणारा कॅमेरा या तिघांनाही दिसला नाही. दर्शनी भागात असलेल्या कॅमेरा झाकण्याचा या प्रयत्न केला व हे तिघेही कॅमेºयात कैद झाले. चोरी करताना डोक्यावर पट्टी बांधली होती. तोंडावर या तिघांनी रु माल बांधला होता. सन्नी कंटक याचे डोळे बारीक असल्यामुळे याला स्थानिक नागरिकांनी त्वरित ओळखले व त्याला पकडण्यात यश आले. या तिन्ही आरोपींवर घरफोडी करणे, बंद असलेल्या जागेत चोरी करणे असे आरोप निश्चित करण्यात आले आहेत.