शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
6
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
7
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
8
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
9
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
10
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
12
ISRO-SpaceX ची भागीदारी यशस्वी, Elon Musk यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट; आता प्लेनपासून गावापर्यंत मिळेल नेट!
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
14
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
15
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
16
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
17
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन
18
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
19
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
20
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा

ग्राहकांना कर्ज देण्यास बँका निरुत्साही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 2:21 AM

दक्षिण रायगडमधील तरुणांची फरफट : शेतकरी, युवा, बचत गटांमधील महिलांमध्ये नाराजी

उदय कळस

म्हसळा : रायगड जिल्ह्यामधील म्हसळा, श्रीवर्धन, तळा, महाड, पोलादपूर, महाड व माणगाव तालुक्यातील अनेक शेतकरी छोटा-मोठा उद्योग करण्यासाठी बँकाकडून मिळणाऱ्या कर्जावर अवलंबून असतात. राष्ट्रीयकृत बँकामार्फत, शेतकरी व युवकांना वेगवेगळे योजनांमधून कर्ज उपलब्ध करून देणे, ही त्यांची प्राथमिक जबाबदारी असते, परंतु दक्षिण रायगडमधील काही तालुक्यांमध्ये अनेक बँकांकडून शेतकरी, युवक व बचत गटातील महिलांना कर्ज उपलब्ध करून देण्यात टाळाटाळ करण्यात येत आहे. वारंवार हेलपाटे मारूनही कर्ज उपलब्ध होत नसल्याने परिसरातील ग्राहकांमध्ये नाराजी आहे.

परिसरातील तालुक्यांत शेळी पालन, कुक्कुट पालन, गाय व म्हैस पालन, दुबार पीक, शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे. मात्र, कर्ज उपलब्ध नसल्यामुळे ते आर्थिक अडचणीत आले आहेत. उद्योग करण्यासाठी सतत सकारात्मक दृष्टिकोन ठेवलेले ग्राहकांनाही बँक कर्ज उपलब्ध करून देत नसल्यामुळे असंतोष पसरत आहे, तर काही बँका गरज नसताना अनेक कागदपत्रे जमा करण्यास सांगत आहेत. कागदोपत्री घोडे नाचवून वेळ काढू भूमिका काही बँकांनी घेतली आहे.बँकामधून मुद्र्रा लोनसाठी अर्ज करून कर्ज उपलब्ध होत नाही, तसेच शासनाच्या विविध योजनांमध्ये आॅनलाइन अर्ज करूनही शासनातर्फे प्रकल्प मंजूर होऊनही बँकांकडून कर्ज उपलब्ध होत नसल्यामुळे शासनाच्या अनुदानाचा लाभ शेतकरी व युवकांना होत नसल्याने ते अडचणीत आले आहेत.म्हसळा व महाडमध्ये राष्ट्रीयकृत बँकांच्या व्यतिरिक्त नाबार्ड फायन्सशियल सर्व्हिस लिमिटेड बँकेने कार्यालय सुरू केले होते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना फायदा होत होता, परंतु सध्या म्हसळा येथील कार्यालय बंद असल्यामुळे म्हसळा, श्रीवर्धन तालुक्यातील शेतकºयांना नाबार्ड बँकेकडून कर्ज पुरवठा होत नाही.शेती उद्योगासाठी कर्ज उपलब्ध करून देणे ही बँकांची प्राथमिक जबाबदारी आहे. मात्र बँकांकडून कर्ज देण्यात टाळाटाळ करण्यात येत असल्याने शेतकºयांमध्ये निरुत्साह आहे. या प्रकरणी शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे, अशी मागणी शेतकºयांकडून होेत आहे.म्हसळा येथील बँक आॅफ इंडिया शाखेत डेअरी, कॅटल डेअरी व्यवसाय करण्यासाठी कर्ज घेण्यासाठी गेले होते. मात्र, बँक मॅनेजरने काहीही ऐकून न घेत कर्ज देऊ शकत नसल्याचे सांगितले. ग्रामीण भागातील बेरोजगारांना कर्ज देत नसल्याचे त्यांनी सांगितले.- बुशरा मुकादम,सुशिक्षित तरुणी, पांगलोळीम्हशी पाळण्यासाठी बँकेकडे कर्ज मागितले असता, स्पष्ट नकार देण्यात आला. शासन नोकºया देत नाही आणि उद्योगासाठी कर्जही मिळत नसल्याची खंत सतीश घोले या तरुणाने व्यक्त केली. तर दूध डेअरी व्यवसायासाठी अपेक्षित कर्ज देण्यास बँक कोणतेही सहकार्य करणार नसल्याचे संदेरीतील आखलाक हजवाने या तरुणाला सांगण्यात आले आहे.व्यवसायासाठी कर्ज देण्यास कोणत्याही प्रकारचा नकार बँकांनी देऊ नये, ग्राहकाला सहकार्य करावे आणि मार्गदर्शन करण्यात यावे, असे बँक मॅनेजरला सांगितले आहे.- आनंद निंबेरकर(एल.एम.डी.)

टॅग्स :Raigadरायगडraigad-pcरायगडbankबँक