अलिबाग किनाऱ्यावरील बंधारा फुटला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 02:06 AM2019-11-15T02:06:26+5:302019-11-15T02:06:36+5:30
समुद्राच्या लाटांपासून अलिबाग शहराचे रक्षण व्हावे, यासाठी क्राँक्रीट ब्लॉक बसवून बांधण्यात आलेला बंधारा तुटला आहे.
आविष्कार देसाई
अलिबाग : समुद्राच्या लाटांपासून अलिबाग शहराचे रक्षण व्हावे, यासाठी क्राँक्रीट ब्लॉक बसवून बांधण्यात आलेला बंधारा तुटला आहे. मध्यंतरी झालेल्या वादळी वाºयामुळे समुद्र खवळलेला होता. महाकाय लाटांपुढे त्याचा टिकाव लागला नसल्याने बंधाºयाचे तुकडे पडले आहेत. मध्येच बंधारा तुटलेल्या अवस्थेमध्ये असल्याने बंधाºयावरील जॉगिंग ट्रॅक नाहीसा झाल्याने मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची चांगलीच अडचण झाली आहे.
अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे ‘क्यार’ चक्रिवादळापाठोपाठ ‘महा’ चक्रिवादळामुळे प्रचंड पाऊस झाला. सोसाट्यांच्या वाºयामुळे समुद्र खवळलेला असल्याने मासेमारी करणाºया होड्या रत्नागिरी, रायगडसह अन्य बंदरांमध्ये नांगर टाकून विसावल्या होत्या. त्यामुळे मच्छीमारांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले, तसेच वादळाचा भातशेतीसह काही प्रमाणात आंबा पिकालाही फटका बसल्याने शेतकरी चांगलाच आर्थिक संकटात सापडला आहे. वादळी वाºयामुळे अलिबाग समुद्रकिनारी बांधण्यात आलेला क्राँक्रीटचा बंधाराही वाहून गेला आहे. अलिबाग शहर हे समुद्राला लागून वसलेले आहे. त्यामुळे समुद्राचे पाणी थेट शहरात घुसू नये, यासाठी बºयाच वर्षांपासून दरड टाकण्यात आली होती. कालांतराने तीही अत्यव्यस्थ झाल्याने उधाणाच्या कालावधीत आणि पावसाळ्यात समुद्राचे पाणी हे किनाºयावरून थेट शहरात घुसत होते. त्याचा फटका शास्त्रीनगर, कोळीवाडा, कस्टम कॉलनी, जेएसएम कॉलेजचे मैदान, अलिबागचा मेन बिच समोरील परिसर, क्रीडाभुवन त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या इमारतीपर्यंतही पाणी जात होते.
तातडीने बंधाºयाची दुरस्ती करण्यात आली नाही तर समुद्राचे पाणी आपली मर्यादा ओलांडण्याची भीती असल्याने नव्याने बंधारा उभारणे गरजेचे होते. त्यानुसार प्रथम २००७ सालापासून कोळीवाडा (बंदर विभाग कार्यालय) ते जेएसएम कॉलेज या ठिकाणी बंधारा बांधण्यास सुरुवात झाली. हा बंधारा पूर्वी ग्रोएन्स पद्धतीचा होता. त्यानंतर त्यामध्ये काही आवश्यक बदल सुचवून क्राँक्रीटचे ब्लॉक तयार करून त्याला लोखंडी जाळी बसवण्यात आली. बंधाºयाचे काम हे दोन टप्प्यांमध्ये केले होते. यासाठी सुमारे ११ कोटी रुपयांचा खर्च केला होता. २०१४-१५ या कालावधीत बंधाºयाचे काम पूर्ण झाले.
बंधारा बांधताना त्यावर क्राँक्रीट अंथरण्यात आले होते. त्यामुळे अलिबागकरांना चांगला जॉगिंग ट्रॅक उपलब्ध झाला होता. त्या ट्रॅकचा वापर मार्निंग वॉकसाठी मोठ्या संख्येने करण्यात येत होता. बंधारा झाल्याने अलिबागच्या समुद्रकिनाºयाला अनोखे वैभव प्राप्त झाले होते.
अलिबाग हे पर्यटकांच्या आवडीचे ठिकाण असल्याने पर्यटकांचीही चांगलीच सोय होत होती. त्याच बंधाºयावर नगरपालिकेने बसण्याची व्यवस्थाही केली आहे. तसेच व्यायामाचे साहित्यही उभारलेले आहे. त्यामुळे या बंधाºयामुळे सर्वांचीच सोय होत होती.
>तातडीने दुरु स्ती करण्याची मागणी
समुद्राच्या लाटांपुढे या बंधाºयाचा टिकाव लागला नाही. सीव्ह्यूू हॉटेल समोरील बंधारा सुमारे ३० मीटरपर्यंत तुटला आहे. त्यामुळे सर्व दगड वर आले असल्याने त्यावरून आता चालता येत नाही. वरचा बंधारा सध्या तरी सुस्थितीमध्ये असल्याने त्याचा वापर केला जात आहे; परंतु बंधाºयाची तातडीने दुरुस्ती केली नाही तर सुस्थितीमध्ये असणारा वरील बंधाराही तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे संबंधित विभागाने यांची तातडीने दखल घेऊन बंधाºयांच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी जोर धरत आहे. बंधाºयावर बसून सायंकाळी पाण्यात बुडणारा तांबडा सूर्य पाहता येत होता. तसेच समुद्राला भरती असली की, या बंधाºयावरून फेरफटका मारता येत होता. अलिबागमधील प्रशासकीय यंत्रणा लवकरच या बंधाºयाची दुरुस्ती करेल, असे एका पर्यटकाने ‘लोकमत’ला सांगितले.