शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

अलिबाग किनाऱ्यावरील बंधारा फुटला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 2:06 AM

समुद्राच्या लाटांपासून अलिबाग शहराचे रक्षण व्हावे, यासाठी क्राँक्रीट ब्लॉक बसवून बांधण्यात आलेला बंधारा तुटला आहे.

आविष्कार देसाई अलिबाग : समुद्राच्या लाटांपासून अलिबाग शहराचे रक्षण व्हावे, यासाठी क्राँक्रीट ब्लॉक बसवून बांधण्यात आलेला बंधारा तुटला आहे. मध्यंतरी झालेल्या वादळी वाºयामुळे समुद्र खवळलेला होता. महाकाय लाटांपुढे त्याचा टिकाव लागला नसल्याने बंधाºयाचे तुकडे पडले आहेत. मध्येच बंधारा तुटलेल्या अवस्थेमध्ये असल्याने बंधाºयावरील जॉगिंग ट्रॅक नाहीसा झाल्याने मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची चांगलीच अडचण झाली आहे.अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे ‘क्यार’ चक्रिवादळापाठोपाठ ‘महा’ चक्रिवादळामुळे प्रचंड पाऊस झाला. सोसाट्यांच्या वाºयामुळे समुद्र खवळलेला असल्याने मासेमारी करणाºया होड्या रत्नागिरी, रायगडसह अन्य बंदरांमध्ये नांगर टाकून विसावल्या होत्या. त्यामुळे मच्छीमारांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले, तसेच वादळाचा भातशेतीसह काही प्रमाणात आंबा पिकालाही फटका बसल्याने शेतकरी चांगलाच आर्थिक संकटात सापडला आहे. वादळी वाºयामुळे अलिबाग समुद्रकिनारी बांधण्यात आलेला क्राँक्रीटचा बंधाराही वाहून गेला आहे. अलिबाग शहर हे समुद्राला लागून वसलेले आहे. त्यामुळे समुद्राचे पाणी थेट शहरात घुसू नये, यासाठी बºयाच वर्षांपासून दरड टाकण्यात आली होती. कालांतराने तीही अत्यव्यस्थ झाल्याने उधाणाच्या कालावधीत आणि पावसाळ्यात समुद्राचे पाणी हे किनाºयावरून थेट शहरात घुसत होते. त्याचा फटका शास्त्रीनगर, कोळीवाडा, कस्टम कॉलनी, जेएसएम कॉलेजचे मैदान, अलिबागचा मेन बिच समोरील परिसर, क्रीडाभुवन त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या इमारतीपर्यंतही पाणी जात होते.तातडीने बंधाºयाची दुरस्ती करण्यात आली नाही तर समुद्राचे पाणी आपली मर्यादा ओलांडण्याची भीती असल्याने नव्याने बंधारा उभारणे गरजेचे होते. त्यानुसार प्रथम २००७ सालापासून कोळीवाडा (बंदर विभाग कार्यालय) ते जेएसएम कॉलेज या ठिकाणी बंधारा बांधण्यास सुरुवात झाली. हा बंधारा पूर्वी ग्रोएन्स पद्धतीचा होता. त्यानंतर त्यामध्ये काही आवश्यक बदल सुचवून क्राँक्रीटचे ब्लॉक तयार करून त्याला लोखंडी जाळी बसवण्यात आली. बंधाºयाचे काम हे दोन टप्प्यांमध्ये केले होते. यासाठी सुमारे ११ कोटी रुपयांचा खर्च केला होता. २०१४-१५ या कालावधीत बंधाºयाचे काम पूर्ण झाले.बंधारा बांधताना त्यावर क्राँक्रीट अंथरण्यात आले होते. त्यामुळे अलिबागकरांना चांगला जॉगिंग ट्रॅक उपलब्ध झाला होता. त्या ट्रॅकचा वापर मार्निंग वॉकसाठी मोठ्या संख्येने करण्यात येत होता. बंधारा झाल्याने अलिबागच्या समुद्रकिनाºयाला अनोखे वैभव प्राप्त झाले होते.अलिबाग हे पर्यटकांच्या आवडीचे ठिकाण असल्याने पर्यटकांचीही चांगलीच सोय होत होती. त्याच बंधाºयावर नगरपालिकेने बसण्याची व्यवस्थाही केली आहे. तसेच व्यायामाचे साहित्यही उभारलेले आहे. त्यामुळे या बंधाºयामुळे सर्वांचीच सोय होत होती.>तातडीने दुरु स्ती करण्याची मागणीसमुद्राच्या लाटांपुढे या बंधाºयाचा टिकाव लागला नाही. सीव्ह्यूू हॉटेल समोरील बंधारा सुमारे ३० मीटरपर्यंत तुटला आहे. त्यामुळे सर्व दगड वर आले असल्याने त्यावरून आता चालता येत नाही. वरचा बंधारा सध्या तरी सुस्थितीमध्ये असल्याने त्याचा वापर केला जात आहे; परंतु बंधाºयाची तातडीने दुरुस्ती केली नाही तर सुस्थितीमध्ये असणारा वरील बंधाराही तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे संबंधित विभागाने यांची तातडीने दखल घेऊन बंधाºयांच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी जोर धरत आहे. बंधाºयावर बसून सायंकाळी पाण्यात बुडणारा तांबडा सूर्य पाहता येत होता. तसेच समुद्राला भरती असली की, या बंधाºयावरून फेरफटका मारता येत होता. अलिबागमधील प्रशासकीय यंत्रणा लवकरच या बंधाºयाची दुरुस्ती करेल, असे एका पर्यटकाने ‘लोकमत’ला सांगितले.