पोलादपूर : तालुक्यातील बोरावळे ग्रामपंचायतीमधील गुडेकर कोंड येथील मुंबईस्थित तरुणांनी ग्रामस्थांना एकत्र करून श्रमदानातून कामथी नदीवरील मावळ्याचा डोह येथे वनराई बंधारा बांधला. यामुळे काही प्रमाणात या गावचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.पोलादपूर तालुक्यात डिसेंबर, जानेवारीच्या नंतर पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात जाणून येथे त्यामुळे गुरांना पाणी मिळत नाही. कपडे धुवायला किंवा आंघोळीला पाणी मिळत नाही. मात्र सर्वच ग्रामस्थांनी जर वनराई बंधारे बांधले तर पाण्याची समस्या दूर होवू शकते याची सुरुवात सामाजिक कार्यकर्ते राम गुडेकर या ग्रामस्थांनी केली आहे. श्रमदानातून बंधारा बांधण्यासाठी मुंबई आणि ग्रामस्थ मंडळ गुडेकर कोंड अध्यक्ष रमेश जंगम, उपाध्यक्ष तानाजी गुडेकर, खजिनदार शशिकांत गुडेकर, सचिव गणेश पालकर, नामदेव गुडेकर, यशवंत गुडेकर, सुरेश गुडेकर, ज्ञानेश्वर गुडेकर, तुकाराम गुडेकर, रूमाजी गुडेकर, दीपक जंगम, चिमाजी पालकर, रामा जंगम, सदाशिव जंगम, बबन जंगम, संतोष जंगम, रामा गुडेकर, चंद्रकांत गुडेकर, प्रकाश गुडेकर, बाळाराम गुडेकर, राम गोविंद गुडेकर, जनार्दन गुडेकर, रवींद्र गुडेकर, गणेश गुडेकर, प्रमोद गुडेकर, संतोष गुडेकर, रूपेश जंगम तसेच गावातील महिला आदी ग्रामस्थ मंडळींनी मेहनत घेतली.
मावळ्याचा डोह येथे लोकसहभागातून वनराई बंधारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 2:35 AM