निखिल म्हात्रेअलिबाग : जिल्ह्यात गणेशोत्सव जल्लोषात साजरा करण्याची परंपरा आहे. मात्र, कोरोनाचे सावट सर्वच सणांवर पडत असल्याचे दिसून येते. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन करताना आता थेट कोणालाच विसर्जन ठिकाणी जाता येणार नाही. प्रशासनाकडे बाप्पाची मूर्ती सुपुर्द केल्यावर, तेच बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन करणार आहेत.डिजेच्या ठेक्यावर थिरकणारी पावल, पारंपरिक वाद्याच्या आधार घेत गणपती विसर्जनासाठी निघणाऱ्या, विसर्जनाच्या वेळी नागरिकांच्या मनोरंजनासाठी आणण्यात येणारे सेलिब्रिटी या वर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे दिसणार नाहीत. अगदी शांततेत गणपती विसर्जन होणार असून, नागरिक जिल्हा प्रशासनाने दिलेल्या नियमांचे अगदी काटेकोर पालन करताना दिसून येत आहेत.गणेशोत्सव म्हणजे कोकणवासियांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. गणपती सणासाठी बाहेरगावी राहत असलेले नागरिक गावाकडे परतले आहेत. गावाकडे आल्यावर गणपतीत काहीतरी वेगळेपण करावे, असे त्यांचे नियोजन असायचे. मात्र, त्यांना या वर्षी गणपती उत्सवासाठी काही वेगळे करता आले नाही. त्यामुळे या वर्षी अगदी घरगुती वस्तू वापरून गणपती आरास सजावटीच्या कामांना सुरुवात केली आहे. या वर्षी संपूर्ण कोकणात पहिल्यांदाच साधेपणात गणेशोत्सव सण साजरा होत आहे.गणेश उत्सवालाही सध्या इव्हेंटचे स्वरूप प्राप्त झाले आहे. प्रत्येक विभागात राजाच्या नावे गणेशोत्सव साजरा होतो. नवसाला पावणाºया गणपतींचे फॅड वाढते आहे. मात्र, आता कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या वर्षी सणांना इव्हेन्ट बनविणाºया मंडळांना छेद लागला आहे. या वर्षी डीजेच्या ढणढणाटही थांबणार आहे.>भाजी विकणाºया आदिवासी महिला आल्या नाहीतगणपती दोन दिवसांवर असताना पायनू तांदूळ, पायनू मीठ, तसेच भाजीपाला विकण्यासाठी गावागावांमध्ये आदिवासी महिला येत असत. त्यांच्याकडून गावातील महिला अशा विविध वस्तुंची खरेदी करायच्या. मात्र, कोरोनाच्या सावटामुळे विविध भागातीलआदिवासी महिला भाजीपाला विकण्यासाठी गावागावात मोठ्यासंख्येने पोहोचल्या नाहीत.>पारंपरिक पद्धत जपण्याचा प्रशासनाचा प्रयत्नशहरी व ग्रामीण भागातील गणपती विसर्जन घाटावर नागरिकांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने तैनात केलेल्या सुरक्षा रक्षकांकडे आपले बाप्पा देऊन जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे अवाहन करण्यात आले आहे. संबंधित कर्मचारी बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन केल्यावर संबंधित भक्ताला गणपतीचा पाट आणि त्यावर माती देणार आहेत.>१० दिवस असणारचोख पोलीस बंदोबस्तनागरिकांनी गर्दी करू नये, म्हणून सर्व सार्वजनिक गणेश मंडळांना सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांच्या मदतीसाठी राज्य राखीव दलाची एक कंपनी, शीघ्रकृती दलाचे पथक जिल्ह्यात तळ ठोकून आहे. हा पोलीस बंदोबस्त गणपतीच्या१० दिवसांच्या कालावधीत असणार आहे.
बाप्पाला द्यावा लागणार दारातूनच निरोप, प्रशासनच करणार गणेशमूर्तीचे विसर्जन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 1:12 AM