‘बाटु’च्या कुलगुरूपदी विलास गायकर कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 12:12 AM2018-10-25T00:12:31+5:302018-10-25T00:12:36+5:30

रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ (बाटु)चे कुलगुरू डॉ. विलास जी. गायकर यांनी तडकाफडकी राज्यपालांकडे राजीनामा दिला होता.

'Batu' Chancellor of the Bandhu remains a villain | ‘बाटु’च्या कुलगुरूपदी विलास गायकर कायम

‘बाटु’च्या कुलगुरूपदी विलास गायकर कायम

Next

माणगाव : रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ (बाटु)चे कुलगुरू डॉ. विलास जी. गायकर यांनी तडकाफडकी राज्यपालांकडे राजीनामा दिला होता. मात्र, तंत्रशिक्षणमंत्री व सचिवांशी झालेल्या बैठकीत त्यांना राजीनामा मागे घेण्यास सांगितले. राज्याचे तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे व तंत्रशिक्षण विभागाकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याचे कारण देत त्यांनी राजीनामा दिल्याचे बोलले जात होते. वैयक्तिक कारणास्तव आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले असले, तरी उच्चशिक्षण विभागाच्या कारभाराला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलल्याची चर्चा होती. येत्या मार्च महिन्यात कुलगुरूंचा कार्यकाळ संपणार आहे.
कुलगुरूपदी नियुक्ती झाल्यापासून सतत मागणी करूनही एकाही पदाला मंजुरी दिली नाही. ‘बाटु’ हे राज्यातील तंत्रशास्त्र विद्यापीठ बनले असून, राज्यातील विविध भागांतील अभियांत्रिकी, आर्किटेक्चर, हॉटेल मॅनेजमेंट, औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयांनी ‘बाटु’ची संलग्नता स्वीकारली.
सध्या ‘बाटु’कडे १०८ महाविद्यालये संलग्न आहेत. मात्र, या महाविद्यालयांना सुविधा देण्यासाठी आवश्यक असलेले विभागीय केंद्र, उपकेंद्रांची स्थापना केली नाही. एकाही ठिकाणी जागा मिळालेली नाही. यातच कुलसचिव असलेले डॉ. सुनील भांबरे यांची नियुक्ती पेणच्या पॉलिटेक्निक महाविद्यालयत झाली. तेव्हा डॉ. भांबरे यांच्याकडे प्राचार्य आणि कुलसचिवपदाची जबाबदारी ठेवण्याची विनंती कुलगुरू डॉ. गायकर यांनी उच्चशिक्षण विभागाला केली. मात्र, ही विनंती धुडकावून लावण्यात आली. यामुळे निराश झालेल्या कुलगुरूंनी थेट राजीनामाच दिला होता. ‘बाटु’ विद्यापीठ नवीन असून, विविध पदांना मंजुरी देण्याची घोषणा उच्चशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली होती; परंतु विद्यमान स्थितीत एकही अधिकारी पूर्णवेळ नाही. मुळात विद्यापीठातच अनेक पदे रिक्त असून, नव्याने स्थापन झालेल्या तंत्रशास्त्र विद्यापीठातही पदभरती झाली नाही.
.वैयक्तिक कारणाने आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले असले, तरी उच्चशिक्षण विभागाच्या कारभाराला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलल्याची चर्चा होती. सध्या ‘बाटु’कडे १०८ महाविद्यालये संलग्न आहेत.

Web Title: 'Batu' Chancellor of the Bandhu remains a villain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.