डोळ्यांच्या साथीबाबत सतर्कता बाळगा ;डोळे आल्यास बाहेर फिरणे टाळा - पद्मश्री डॉ तात्याराव लहाने
By वैभव गायकर | Published: August 20, 2023 08:22 PM2023-08-20T20:22:27+5:302023-08-20T20:22:35+5:30
डोळे आल्यास शक्यतो प्रवास करणे टाळावे,लहान मुलांना शाळेत देखील पाठवू नये यामुळे हि साथ पसरण्यास अटकाव होत असल्याचे लहाने यांनी सांगितले.
पनवेल:मुंबई सह नवी मुंबईत डोळ्यांची साथ मोठ्या प्रमाणात पसरत आहे.अनेकांना मध्ये यासंदर्भात गैरसमज पसरले असुन डोळ्यांच्या साथीवर प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ पद्मश्री डॉ तात्याराव लहाने यांनी महत्वाचे मार्गदर्शन करत डोळ्यांच्या साथीला न घाबरता योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सुचना दि.20 रोजी नवी मुंबई मध्ये ऍग्री व्हीसडन व्हेचर्सच्या यमी ट्रीट्स या फूड सेंटरच्या उदघाटना दरम्यान केले.
डोळे आल्यास शक्यतो प्रवास करणे टाळावे,लहान मुलांना शाळेत देखील पाठवू नये यामुळे हि साथ पसरण्यास अटकाव होत असल्याचे लहाने यांनी सांगितले. ऋतुबदलानुसार आजार होत असतात डोळ्यांची साथ त्याचा प्रकार असुन आडीजोव्हायरस आणि इंट्राव्हायरसची हि साथ आहे.डोळ्यातून पाणी येणे,डोळ्यातून घाणे येणे,डोळ्यातून जळजळ होणे,डोळे सुजणे आदी प्रकार यामुळे घडत असुन जास्त वेळ डोळ्यांची साथ बलावल्यास नेत्ररोग तज्ज्ञांचा सल्ला घेण्याचे अवाहन लहाने यांनी केले आहे.नवी मुंबई मधील कार्यक्रमाला ऍग्री व्हीसडन व्हेचर्सचे शेखर सावंत आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी वेगवगेळ्या प्रकारची पिके आपल्या शेतीत घ्यावीत डॉ लहाने यांनी शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळाले पाहीजे.या व्यतिरिक्त विविध प्रकारचे पीक शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत घेणे गरजेचे असल्याचे सांगितले.थोड्याश्या भाज्या महागल्या तर आपण लगेच शेतकऱ्यांना नावे ठेवतो इतर पदार्थ महागले तर आपण काय बोलत नाही.शेतकरी टिकला पाहिजे याबाबत देखील सर्वानी विचार करण्याची गरज आहे.