श्रीवर्धनमधील दिवेआगरचा समुद्रकिनारा झाला स्वच्छ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 11:40 PM2019-09-15T23:40:01+5:302019-09-15T23:40:09+5:30
श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर समुद्रकिनारी शुक्रवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर समुद्रकिनारी शुक्रवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. अनंत चतुर्दशीला समुद्रकिनारी दिवेआगर व बोर्लीपंचतन शहरातील हजारो गणेशमूर्तींचे विसर्जन केले गेले. त्यावेळी गणेशमूर्तींबरोबरच निर्माल्य, सजावटीचे साहित्य समुद्रात सोडण्यात आल्याने किनारे अस्वच्छ झाले होते. शिवशंभू प्रतिष्ठानच्या वतीने समुद्रकिनाऱ्यावरील निर्माल्य तसेच साचलेले प्लॅस्टिक व अन्य कचरा उचलण्यात आला. तसेच लाटांमुळे किनाºयावर वाहत आलेल्या मूर्तींचे पुन:विसर्जन करण्यात आले.
म्हसळा व श्रीवर्धनमधील शिवशंभू प्रतिष्ठान संघटनेच्या सभासदांकडून महिन्यातून दोन वेळा परिसरात स्वच्छता मोहीम राबवली जाते. यावेळी पर्यावरणास हानिकारक असलेले प्लॅस्टिक, थर्माकोल, निर्माल्य व उत्सव प्रसंगी वापरण्यात आलेल्या अनेक टाकाऊ वस्तू जमा करून त्याची विल्हेवाट लावली गेली.