सलग सुट्ट्यांमुळे रायगडमधील समुद्रकिनारे गजबजले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2020 05:44 AM2020-11-18T05:44:24+5:302020-11-18T05:45:04+5:30
काशिद बीचवर गर्दी
लोकमत न्यूज नेटवर्क
बोर्ली-मांडला / अलिबाग : रायगड जिल्हा आता हळूहळू कोरोनामुक्तीकडे जाण्यास सुरुवात झाली आहे. शासनाने टाळेबंदीत शिथिलता दिल्यानंतर सर्व व्यवहार पुन्हा सुरू झाले आहेत. पर्यटनही सुरू झाल्याने सात-आठ महिन्यांनंतर जिल्ह्यात पर्यटकांचा राबता दिसून येत आहे. दीपावली पाडवा, भाऊबीज, शनिवार, रविवार व सोमवार अशा सलग सुट्ट्यांंमुळे पर्यटकांनी समुद्रकिनारे हाउसफुल्ल झाले होते.
मुरुड-जंजिरा तसेच काशिद बीचवर पर्यटक पर्यटनाचा मनसोक्त आनंद लुटत असल्याचे चित्र दिसून आले. या ठिकाणी रस्त्यावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल सात महिन्यांनंतर अनलॉकनंतर येथील पर्यटन व्यवसायाला सुरुवात झाली.
दीपावलीत शनिवार, रविवार
आणि सोमवार अशा सुट्ट्या आल्याने, मुंबई, पुणे अन्य ठिकाणांहून पर्यटक मोठ्या प्रमाणावर आले. या
दिवशी काशिद बीचवर तोबा गर्दी, तर नांदगाव बाजारपेठेत वाहतूककोंडी झाली होती.
वन-डे ट्रीपला पसंती
nरस्ता दुरुस्ती, डांबरीकरणासोबतच साळाव-मुरूड रस्त्यावरील साईडपट्ट्या साफ करण्याची मागणी जोर धरत आहे. रस्त्यावर झाडाझुडपांचा विळखा असल्याने, वळणावर समोरून येणारे वाहन दिसत नाही. त्यामुळे वेळप्रसंगी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
nसलग तीन दिवसांच्या सुट्ट्यांमुळे येथील समुद्रकिनारे हाउसफुल्ल झाले. मात्र, पर्यटकांनी वन-डे ट्रीप पसंत केल्याने येथील हॉटेल, लॉजिंग व्यवसायावर मंदीचे आणि कोरोनाचे सावट दिसून येत होते.