कर्जत : कोकण भागातून पुण्याच्या घाट माथ्यावर जाण्यासाठी पूर्वी ब्रिटिशकाळात असलेल्या रस्त्यावरील वाटसरूंसाठी निर्माण केलेला पिण्याच्या पाण्याचा तलाव आज वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. राज्याच्या पर्यटन विकास कार्यक्र मामध्ये या तलावाचे सुशोभीकरण करण्यासाठी तब्बल एक कोटीचा निधी दिला होता. दरम्यान, तेथील ग्रामपंचायतीने तलावाच्या सुशोभीकरणाची कामे अर्धवट झाली आहेत आणि झालेली कामे निकृष्ट प्रकारची झाली असल्याचा आरोप केला आहे. तीन एकर जागेत पाण्याचा जलाशय असून आजूबाजूला देखील मोठ्या प्रमाणात जागा असलेल्या या तलावात मे महिन्यात देखील भरपूर पाणी साठा असतो. त्या तलावाच्या बांधकामासाठी वापरलेले चिरेबंदी दगड हे आजही सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. तेथे पाण्याची कुंड देखील असून ऐतिहासिक महत्व असलेल्या या तलावाच्या सुशोभीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने एक लाखाचा निधी २०१४ मध्ये मंजूर केला होता. पर्यटन विकास कार्यक्र मा अंतर्गत मंजूर केलेल्या निधीमधून भिवपुरी तलावाच्या टिकाऊपणासाठी अनेक कामे प्रस्ताविक करण्यात आली होती. त्यात संरक्षण भिंत बांधणे, दोन मंदिरे बांधणे, चालण्यासाठी रस्ता, प्रवेशद्वार, बगिचा निर्माण करणे आदी कार्यक्र म राबविताना या ऐतिहासिक तलावाचे काय महत्त्व काय आहे? याची माहिती देणारे फलक अशी कामे करायची होती.कर्जत सार्वजनिक बांधकाम विभागाने यांच्या देखरेखीखाली ही सर्व कामे पर्यटन विकास कार्यक्र माअंतर्गत केली जात आहेत. भिवपुरी गावाच्या ग्रामपंचायतीचे उपसरपंच रमेश पवार यांनी ठेकेदार कंपनीकडे कोणकोणती कामे करण्यात आली आहेत याची माहिती मागितली. त्यावेळी ठेकेदाराने तुम्हाला माहिती द्यायला आम्ही बांधील नसल्याचे उत्तर दिले. त्यानंतर भिवपुरी ग्रामपंचायतीच्या सरपंच अनिता बोडके यांनी कर्जत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे लेखी पत्रव्यवहार करून भिवपुरी तलावाच्या सुशोभीकरण कामाची माहिती मागितली आहे. ग्रामपंचायत कार्यालय हे तलावाच्या शेजारी असल्याने गेल्या वर्षभरात करण्यात आलेल्या कामांची देखरेख केली असता अनेकांनी तलावाच्या सुशोभीकरणाचे काम हे निकृ ष्ट दर्जाचे झाले असल्याचा आरोप केला आहे. रस्त्याचे काँक्र ीटीकरण केले आहे ते अल्पावधीत उखडले असून भाविक आणि ग्रामस्थांना बसण्यासाठी बनविलेले बाकडे मोडकळीस आले आहेत. तर जे एम्टी थिएटर विश्रांतीसाठी बनविले आहेत,त्या इमारतीच्या भिंतीला तडे गेले आहेत अशी तक्र ार ग्रामपंचायतीचे सरपंच,उपसरपंच यांच्यासह सदस्य स्वप्निल भोसले, हेमा वाघमारे, सारिका नवल यांनी केली आहे. (वार्ताहर) भिवपुरी तलावाचे सुशोभीकरणाचे काम हे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सुरु आहे. सध्या ते काम माझ्याकडे आहे, मात्र आतापर्यंत झालेली सर्व कामे ही यापूर्वी तेथे असलेल्या शाखा अभियंता यांच्या कारकिर्दीत झाली आहेत. तरी देखील ग्रामपंचायतीच्या तक्र ारीची दखल आम्ही घेवून सर्व प्रस्तावित कामे टेंडरप्रमाणे करण्याचा प्रयत्न राहील.- व्ही. टी. सूर्यवंशी, शाखा अभियंता.
ऐतिहासिक तलावाचे सुशोभीकरण वादात
By admin | Published: November 27, 2015 2:14 AM