आदर्श अचारसंहितेमुळे पोस्टरबरोबर पोस्टरबाज देखील जमिनीवर; रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

By निखिल म्हात्रे | Published: March 20, 2024 02:56 PM2024-03-20T14:56:32+5:302024-03-20T14:57:21+5:30

...त्यामुळे रस्त्यांनी आता मोकळा श्वास घेतला आहे, असे जिल्हा निवडणूक अधिकाकारी तथा जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सांगितले.

Because of the ideal code of conduct, posters along with posters are also on the ground; The streets breathed a sigh of relief | आदर्श अचारसंहितेमुळे पोस्टरबरोबर पोस्टरबाज देखील जमिनीवर; रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

आदर्श अचारसंहितेमुळे पोस्टरबरोबर पोस्टरबाज देखील जमिनीवर; रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास


अलिबाग - नाक्यानाक्यावर आपल्या विकासकामांचा गाजावाजा करण्यासाठी राजकीय पक्षांना विकास कामांचे फलक लावणे हेच जाहिरातीचे प्रभावी माध्यम ठरले होते. कारण फुकटात प्रसिद्धी मिळवणाऱ्या आणि चमकोगिरी करण्यासाठी राजकीय नेते होर्डींग्ज लावत होते. मात्र अचार संहीता जाहीर होताच 72 तासानंतर जिल्हा प्रशासनाने शहरी व ग्रामिण भागातील सुमारे 20 हाजार 427 काढण्यात आले आहेत. एकूणच पोस्टरबरोबर पोस्टरबाजदेखील जमिनीवर आले आहेत. त्यामुळे रस्त्यांनी आता मोकळा श्वास घेतला आहे, असे जिल्हा निवडणूक अधिकाकारी तथा जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सांगितले.

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर गल्लोगल्ली असणारे नेते-कार्यकर्ते होर्डिंग, पोस्टर आणि बॅनरने शहराचे विद्रूपीकरण नेहमीच करीत असतात. मात्र निवडणूकीच्या तोंडावर बॅनरबाजी करीतचमकोगिरी करणाऱ्यांना अचार संहीता जाहीर होताच आपले बँनर खाली उतरवावे लागले आहेत. अचार संहीता सुरु
होताच विविध पक्षांचे झेंडे, बॅनरबरोबरच 20 हजारपेक्षा जास्त बोर्ड, रस्त्यांवरील पथदिव्यांच्या खांबांना लावलेले तिनशेपेक्षा जास्त बॅनर आणि होर्डिंग उतरवले, असल्याची माहीती किशन जावळे यांनी लोकमतला दिली.

महामार्ग, बाजारपेठ, बस स्थानक अशा गर्दीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जाहिराती दिसून येतात. धार्मिक आणि व्यावसायिक जाहिरातीही झळकत असल्या तरी यामध्ये राजकीय पक्षांच्या जाहिराती मोठ्या प्रमाणात असतात. होर्डींग्ज बाजीत सत्ता धाऱ्यांबरोबर विरोधीपक्षांच्या नेत्यांच्या होर्डीग्ज व बॅनर मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे सरसकट सर्वांचेच बॅनर जिल्हा प्रशासनाने उतरविले आहेत.

जिल्ह्यातील शहर भागातून साधारणत: 12000 तर ग्रामिण भागातून 8000 असे एकूण 20 हाजार 247 अनधिकृत होर्डींग्ज जिल्हाप्रशासनाने उतरविले आहेत. यामध्ये शासकीय संपत्तीचे विद्रुपीकरण यामध्ये शासकीय संपत्तीच्या भिंतीवरील लेखन, पोस्टर्स/पेपर्स किंवा कटआऊट/होर्डिंग/बॅनर/झेंडे इत्यादी निवडणूका जाहिर झाल्यानंतर 72 तासांमध्ये काढून टाकण्याबाबत त्वरीत कार्यवाही करण्यात आली आहे. तर शासकीय संपत्तीचे विद्रुपीकरण व सार्वजनिक जागेचा गैरवापर, सार्वजनिक ठिकाणी जसे रेल्वे स्टेशन, बसस्टँड, विमानतळ, रेल्वेपूल, रस्ते, शासकीयबसेस, इलेक्ट्रीक/टेलिफोन, खांब, नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इमारती येथील अनधिकृत राजकीय जाहिराती निवडणूका जाहिर झाल्यापासून 72 तासात काढून टाकण्याची कारवाई ही तात्काळ सुरु करण्यात आली आहे. जाहीर झालेल्या या आदर्श अचार संहितेमुळे पोस्टर बरोबर पोस्टरबाज देखील जमिनीवर येत ऱस्त्यांनी घेतला मोकळा श्वास घेतला आहे.

Web Title: Because of the ideal code of conduct, posters along with posters are also on the ground; The streets breathed a sigh of relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.