शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

आदर्श अचारसंहितेमुळे पोस्टरबरोबर पोस्टरबाज देखील जमिनीवर; रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

By निखिल म्हात्रे | Published: March 20, 2024 2:56 PM

...त्यामुळे रस्त्यांनी आता मोकळा श्वास घेतला आहे, असे जिल्हा निवडणूक अधिकाकारी तथा जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सांगितले.

अलिबाग - नाक्यानाक्यावर आपल्या विकासकामांचा गाजावाजा करण्यासाठी राजकीय पक्षांना विकास कामांचे फलक लावणे हेच जाहिरातीचे प्रभावी माध्यम ठरले होते. कारण फुकटात प्रसिद्धी मिळवणाऱ्या आणि चमकोगिरी करण्यासाठी राजकीय नेते होर्डींग्ज लावत होते. मात्र अचार संहीता जाहीर होताच 72 तासानंतर जिल्हा प्रशासनाने शहरी व ग्रामिण भागातील सुमारे 20 हाजार 427 काढण्यात आले आहेत. एकूणच पोस्टरबरोबर पोस्टरबाजदेखील जमिनीवर आले आहेत. त्यामुळे रस्त्यांनी आता मोकळा श्वास घेतला आहे, असे जिल्हा निवडणूक अधिकाकारी तथा जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सांगितले.विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर गल्लोगल्ली असणारे नेते-कार्यकर्ते होर्डिंग, पोस्टर आणि बॅनरने शहराचे विद्रूपीकरण नेहमीच करीत असतात. मात्र निवडणूकीच्या तोंडावर बॅनरबाजी करीतचमकोगिरी करणाऱ्यांना अचार संहीता जाहीर होताच आपले बँनर खाली उतरवावे लागले आहेत. अचार संहीता सुरुहोताच विविध पक्षांचे झेंडे, बॅनरबरोबरच 20 हजारपेक्षा जास्त बोर्ड, रस्त्यांवरील पथदिव्यांच्या खांबांना लावलेले तिनशेपेक्षा जास्त बॅनर आणि होर्डिंग उतरवले, असल्याची माहीती किशन जावळे यांनी लोकमतला दिली.महामार्ग, बाजारपेठ, बस स्थानक अशा गर्दीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जाहिराती दिसून येतात. धार्मिक आणि व्यावसायिक जाहिरातीही झळकत असल्या तरी यामध्ये राजकीय पक्षांच्या जाहिराती मोठ्या प्रमाणात असतात. होर्डींग्ज बाजीत सत्ता धाऱ्यांबरोबर विरोधीपक्षांच्या नेत्यांच्या होर्डीग्ज व बॅनर मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे सरसकट सर्वांचेच बॅनर जिल्हा प्रशासनाने उतरविले आहेत.जिल्ह्यातील शहर भागातून साधारणत: 12000 तर ग्रामिण भागातून 8000 असे एकूण 20 हाजार 247 अनधिकृत होर्डींग्ज जिल्हाप्रशासनाने उतरविले आहेत. यामध्ये शासकीय संपत्तीचे विद्रुपीकरण यामध्ये शासकीय संपत्तीच्या भिंतीवरील लेखन, पोस्टर्स/पेपर्स किंवा कटआऊट/होर्डिंग/बॅनर/झेंडे इत्यादी निवडणूका जाहिर झाल्यानंतर 72 तासांमध्ये काढून टाकण्याबाबत त्वरीत कार्यवाही करण्यात आली आहे. तर शासकीय संपत्तीचे विद्रुपीकरण व सार्वजनिक जागेचा गैरवापर, सार्वजनिक ठिकाणी जसे रेल्वे स्टेशन, बसस्टँड, विमानतळ, रेल्वेपूल, रस्ते, शासकीयबसेस, इलेक्ट्रीक/टेलिफोन, खांब, नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इमारती येथील अनधिकृत राजकीय जाहिराती निवडणूका जाहिर झाल्यापासून 72 तासात काढून टाकण्याची कारवाई ही तात्काळ सुरु करण्यात आली आहे. जाहीर झालेल्या या आदर्श अचार संहितेमुळे पोस्टर बरोबर पोस्टरबाज देखील जमिनीवर येत ऱस्त्यांनी घेतला मोकळा श्वास घेतला आहे.

टॅग्स :Code of conductआचारसंहिताElectionनिवडणूक