पार्किंगमुळे चवदार तळ्याच्या भिंतींना धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 02:55 AM2017-08-01T02:55:14+5:302017-08-01T02:55:14+5:30
ऐतिहासिक चवदार तळ्याच्या दक्षिण बाजूस रस्त्यालगत नियमितपणे पार्किंग केल्या जाणाºया अवजड वाहनांच्या बेकायदा पार्किंगमुळे तळ्याच्या संरक्षक भिंतीला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
महाड : ऐतिहासिक चवदार तळ्याच्या दक्षिण बाजूस रस्त्यालगत नियमितपणे पार्किंग केल्या जाणाºया अवजड वाहनांच्या बेकायदा पार्किंगमुळे तळ्याच्या संरक्षक भिंतीला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. या गंभीर गोष्टीकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून के ला जात आहे. या संरक्षक भिंतीलगत बेकायदा वाहने पार्किंग करणाºयांवर वाहतूक पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी दलित कार्यकर्ते अशोक मोरे यांनी केली आहे.
शहरातील वाहतूककोंडीला कारणीभूत ठरत असलेल्या महाडमधील प्रमुख मार्गांवर नो पार्किंग झोन करण्याचा ठराव करून तसा प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडे नगरपरिषदेने मंजुरीसाठी पाठवला होता. त्याला जिल्हाधिकाºयांनी दीड वर्षापूर्वी मंजुरी दिली होती. मात्र या निर्णयाची शहर पोलीस ठाण्याच्या वाहतूक विभागाकडून अंमलबजावणी केली जात नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठेसह सुर्वे हॉस्पिटल, बालाजी मंदिर मार्ग, शिवाजी चौक, चवदार तळे आदी मार्गांवर नियमितपणे होणारी वाहतुकीची कोंडी ही नगरपरिषद व महाडकरांसाठी डोकेदुखी ठरत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून महाड नगरपरिषदेतर्फे बेकायदा हातगाड्या व फेरीवाल्यांवर कारवाईची मोहीम हाती घेण्यात आल्यामुळे या प्रमुख मार्गांनी मोकळा श्वास सोडला असला तरी बेकायदा पार्किंग केलेल्या वाहनांमुळे या प्रमुख मार्गांवरील वाहतूककोंडी दूर होत नसल्याचे दिसून येत आहे.
चवदार तळ्याच्या दक्षिण बाजूला रस्त्यालगत पंचवीस-तीस टन वजनाच्या हायवा व डंपर्स राजरोसपणे पार्किंग केले जात असल्याने तळ्याच्या संरक्षक भिंतीला धोका निर्माण होण्याची शक्यता असून या बेकायदा पार्किंगगुळे वाहतूक कोंडी होत आहे. या रस्त्यालगत नगर परिषदेने नो पार्किंगचे लावलेले फलक देखील या वाहनधारकांनी उखडून टाकले आहेत. या बेकायदा पार्किंग करणाºयांवर वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी या परिसरातील नागरिकांसह शहरवासीयांकडून केली जात आहे.