लोकमत न्यूज नेटवर्ककर्जत : न्यायालयाच्या आदेशामुळे महामार्गावरील अनेक परमिट रूम, वाईन शॉप बंद झाले आहेत, त्यामुळे मद्यपींना तलफ भागविण्यासाठी अनेक किलोमीटरचे अंतर कापून जावे लागते. यावर पर्याय म्हणून गावातील अनेक बीअर शॉपींनी आपल्याच शॉपीमध्ये व्हिस्की विक्र ीसाठी ठेवली आहे. रविवारी कर्जतमधील एका बीअर शॉपीवर कर्जत पोलिसांनी धाड टाकली. त्यामध्ये २२ हजार ९०० रुपयांची दारू जप्त करून बीअर शॉपी मालकावर कारवाई केली आहे.कर्जत तालुक्यातील धाकटे वेणगाव येथील गौरव बीअर शॉपीमध्ये व्हिस्कीची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना त्यांच्या खबऱ्याकडून मिळाली होती. त्यामुळे पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ढवळे, सहाय्यक फौजदार सुभाष राजमाने, पोलीस शिपाई सुग्रीव गवाणे, सागर नायकुडे, ज्ञानेश्वरी जाधव, भूषण चौधरी यांनी ११ जून रोजी सायंकाळी ६.३० च्या सुमारास धाड टाकली. त्यावेळी बीअर शॉपीमध्ये विविध कंपन्यांच्या विविधप्रकारच्या व्हिस्की, रम, व्होडका, देशी दारू विक्रीस ठेवल्याचे आढळून आले.
बीअर शॉपीवर पोलिसांचा छापा
By admin | Published: June 13, 2017 2:56 AM