शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
2
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
3
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
4
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
5
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
6
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
7
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
8
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
9
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
10
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
11
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
12
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
13
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
14
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
15
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
16
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
17
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
18
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
19
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
20
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...

शिवसेनेच्या वाहतूक सेनेचे उपोषण मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 11:35 PM

व्यवस्थापकांबरोबरील चर्चेने निर्णय; पाच दिवसांनी दिघी पोर्ट, प्रशासनाचा प्रतिसाद मिळाला

दिघी : स्थानिकांना रोजगार देण्याच्या मागणीसाठी गेले पाच दिवस सुरू असलेले सेनेच्या वाहतूक सेनेचे उपोषण बुधवारी मागे घेण्यात आले. मागण्या मान्य करण्याच्या अटीवर उपोषण संपवण्यात आले. व्यवस्थापक विजय कलंत्री यांच्याशी फोनवरून झालेल्या चर्चेत सेनेचे उपोषण मागे घेण्यात आले.दिघी पोर्ट प्रशासनाने स्थानिकांना रोजगार द्यावा तसेच स्थानिकांना वाहतूक व्यवसायाची संधी तातडीने द्यावी, वाहन चालकांकडून डेव्हलपमेंट चार्जच्या नावाखाली आकारण्यात येणारे १०० रुपये प्रवेश कर बंद करावे, दिघी पोर्ट प्रशासनाने रु ग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी, स्थानिकांना पाणी द्यावे अशा मागण्यांसाठी शिवसेना पक्षाच्या अवजड वाहतूक सेनेच्या माध्यमातून २६ जानेवारीपासून आमरण उपोषण सुरू केले होते.यापूर्वी दिघी बंदरावर जप्तीची नामुष्की ओढवली होते. सध्या दिघी पोर्टच्या व्यवस्थापकावर पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे देखील दाखल आहे. सिक्युरिटीजने पगारासाठी कित्येक वेळा पोर्ट विरोधात आंदोलने केली आहे. आता राजकीय पक्षांकडून आंदोलने सुरू आहेत. पोर्टमध्ये जाणाऱ्या वाहनचालकांना विश्रामगृह असावे या कारणांसाठी शिवसेनेच्या अवजड वाहतूक सेनेच्या वतीने श्रीवर्धन उपतालुकाप्रमुख सुकुमार तोंडलेकर, महाराष्ट्र राज्य अवजड वाहतूक सेना सचिव नरेश चाळके तसेच म्हसळा महिला उपसंघटक निशा पाटील हे तिघे गेली चार दिवस आमरण उपोषणास बसले होते.उपोषण मागणीनुसार प्रशासनासोबत शिवसेना अवजड वाहतूक सेना व दिघी ग्रामस्थ बैठक घेण्यात आली. यावेळी दिघी पोर्ट अधिकारी तायडे, दिघी सागरी पोलीस ठाण्याचे अधिकारी सोनके, स्थानिक प्रशासकीय अधिकारी व्ही. एच. गिरी, सुनील मोरे, नीलेश पवार, महाराष्ट्र राज्य वाहतूक सेना अध्यक्ष इंद्रजित सिंह बल, जिल्हाप्रमुख रवि मुंडे, तालुका प्रमुख प्रतोष कोलथरकर,दामोदर पाटील, सुजित तांदलेकर आदी उपस्थित होते.फेब्रुवारीत दिघी पोर्ट दुसऱ्याच्या ताब्यातदिघी पोर्टवर सध्या बँकांचे नियंत्रण आहे. येत्या महिन्यात बंदर हे जेएनपीटी किंवा अदानी पोर्टच्या नियंत्रणाखाली असणार आहे. त्यामुळेच सेनेच्या या मागण्या कितपत मान्य होतील हे येत्या काळात समजेल.सुरक्षारक्षकांच्या आंदोलनाला पाठिंबा नव्हतादिघी पोर्टमध्ये सत्तर टक्के हे स्थानिक कामगार आहेत. पगारासाठी गेली कित्येक वेळा दिघी पोर्टच्या सुरक्षारक्षकांनी आंदोलने केलेली मात्र कोणत्याही पक्षाने त्यांना जाहीर पाठिंबा दिला नव्हता, शिवाय भेटही घेतली नव्हती.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना