स्वतः फसला म्हणून दुसऱ्याला फसवण्यास गेला अन् गळाला लागला; चार आरोपींना अटक

By राजेश भोस्तेकर | Published: October 4, 2023 03:48 PM2023-10-04T15:48:55+5:302023-10-04T15:49:16+5:30

स्थानिक गुन्हे विभागाची कारवाई

Being deceived himself, he went to deceive another and began to strangle; Four accused arrested in alibaug | स्वतः फसला म्हणून दुसऱ्याला फसवण्यास गेला अन् गळाला लागला; चार आरोपींना अटक

स्वतः फसला म्हणून दुसऱ्याला फसवण्यास गेला अन् गळाला लागला; चार आरोपींना अटक

googlenewsNext

अलिबाग : डी एड प्रवेश मिळवून देण्यासाठी आणि नोकरी लावण्यासाठी त्याला पाच लाखाचा चुना लावण्यात आला. आपण फसलो गेल्याचा अनुभव गाठीशी असल्याने दुसऱ्याला पण फसवू शकतो हा उद्देश समोर ठेवून पश्चिम बंगाल मधील आरोपीने आणि त्याच्या सहा साथीदारांनी कोल्हापूर मधील एका पालकाला मुलीचे एमबीबीएसमध्ये अलिबाग महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचे खोटे सांगून ३५ लाखाला गंडा घातल्याची घटना २७ सप्टेंबर रोजी घडली होती. रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने सात पैकी चार जणांच्या पश्चिम बंगाल मधून पकडुन मुसक्या आवळल्या आहेत. आरोपी कडून २० लाख रोख रक्कम पाच लाख किमतीची कार असा २५ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चार ही आरोपींना ८ ऑक्टोंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. फरार तीन आरोपींचा स्थानिक गुन्हे विभागातर्फे शोध सुरू आहे. 

एम बी बी एस प्रवेश मिळवून देण्याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या तपासाबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी बुधवारी ४ ऑक्टोंबर रोजी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यावेळी उपस्थित होते. आपण फसलो गेलो म्हणून दुसऱ्याला फसविण्याच्या फंदात आरोपी अडकले आहेत. 

कोल्हापूर येथील फिर्यादी फिर्यादी अभिजित वणिरे रा. कोल्हापूर यांच्या मुलीला अलिबाग येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस प्रथम वर्षाला प्रवेश घ्यायचा होता. याबाबत आरोपी पंकज मेहता, अनिल मंडल रा. पश्चिम बंगाल, नारायण खरमोडे या खोट्या नावाने फिर्यादी वणिरे यांच्याशी संपर्क करून तुमच्या मुलीला अलिबाग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देतो यासाठी काही रक्कम द्यावी लागेल असे सांगितले. वणिरे यांनी मुलीचा प्रवेश होणार या आनंदात आरोपीवर विश्वास ठेवला.

 फिर्यादी हे गळाला लागले असल्याची खात्री झाल्यानंतर आरोपी सोमेन सुधांशू मन्ना (३३), सौरभ सौम्य दास (४३), सोमेश बिरेंद्रनाथ (२७), अभिषेक कुमार दिलीप रज्जाक (२२) आणि फरार तीन जण सर्व रा. पश्चिम बंगाल हे खाजगी वाहनाने अलिबाग येथे आले. विशेष म्हणजे अलिबाग मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कुठे आहे याची सुतराम कल्पना आरोपींना नव्हती. चौकशी केल्यानंतर जिल्हा रुग्णालय येथे फिर्यादी यांना बोलावून २७ सप्टेंबर रोजी ३२ लाख ५० हजार रुपये ताब्यात घेतले. त्यानंतर आरोपी हे पुन्हा माघारी फिरले. चार जण हे आणलेल्या स्कॉर्पिओ वाहनाने तर इतर तीन जण दुसऱ्या मार्गाने रवाना झाले. 

आरोपी यांनी दिलेला मोबाईल नंबर लागत नसल्याने फिर्यादी वणिरे यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे गुन्ह्याचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे विभागाचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना आदेश दिले. त्यानुसार पो उप निरीक्षक विशाल शिर्के, पोह अमोल हंबीर, प्रतीक सावंत, पोना सचिन वावेकर, पोशी ईश्वर लांबोटे याचे पथक तयार केले. पथकाने सायबर सेलचे पोना तुषार घरत, अक्षय पाटील याच्या मदतीने डंप डाटा व सीडीआर च्या माध्यमातून आरोपी हे हैद्राबादमार्गे ओरिसा जात असल्याचे निष्पन्न झाले. स्थानिक गुन्हे पथक हे आरोपी गावी पोहचण्याच्या आत विमानाने आधी पोहचून दिघा पूर्व मेदिनिपुर, पश्चिम बंगाल येथून आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

Web Title: Being deceived himself, he went to deceive another and began to strangle; Four accused arrested in alibaug

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.