शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
5
२५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
6
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
7
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
8
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
10
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
11
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
12
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
13
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
14
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
16
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
17
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
18
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
19
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?

घरचेच उमेदवार असल्याने शिवतीर्थावर उमटणार घराणेशाहीचा ठसा

By admin | Published: February 16, 2017 2:12 AM

रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे. त्यामुळे अध्यक्षपदाच्या रेसमध्ये असलेल्या महिला उमेदवारांच्या

आविष्कार देसाई / अलिबागरायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे. त्यामुळे अध्यक्षपदाच्या रेसमध्ये असलेल्या महिला उमेदवारांच्या लढती या विशेष लक्षवेधी ठरणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अदिती तटकरे, शिवसेनेकडून मानसी दळवी, तर शेकापकडून नीलिमा पाटील आणि सुश्रुता पाटील या प्रमुख दावेदार मानल्या जातात. शिवसेनावगळता शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेसने घराणेशाहीचा ठसा शिवतीर्थावर उमटविण्यासाठी घरातीलच उमेदवार रणांगणावर उतरविले आहेत. त्यामुळे सत्तासंघर्षाचा वारसा असाच पुढे सुरू राहणार की त्याला ब्रेक लागणार हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.रायगड जिल्हा परिषदेने शतकी अर्थसंकल्प सादर केल्याने राज्याच्या नजरा रायगड जिल्हा परिषदेकडे वळल्या होत्या. आर्थिकदृष्ट्या कमालीच्या सक्षम असलेल्या जिल्हा परिषदेवर आपलेच वर्चस्व राहावे, अशी महत्त्वाकांक्षा सर्वच राजकीय पक्षांची असू शकते. त्याच शिवतीर्थावरील सत्ता काबीज करण्यासाठी शेकाप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा या प्रमुख राजकीय पक्षांमध्ये चुरस आहे. जिल्ह्याच्या राजकारणातील समीकरणे बदललेली असल्याने कोणत्याही एका पक्षाला सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोचता येणार नाही. याचसाठी शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ठिकठिकाणी जमेल तशी युती केली आहे, तीच परिस्थिती काँग्रेस, शिवसेना, भाजपा यांची आहे. सातत्याने सत्तेचे वलय आपल्याच आसपास फिरत राहावे यासाठी शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच प्रयत्नशील राहिली असल्याचे मागे वळून पाहिल्यावर दिसून येते. इतर पक्षही त्याला अपवाद नसावेत. सत्ता आपल्याच अमलाखाली असावी यासाठी जिल्ह्यात घराणेशाही सुरू असल्याचे चित्र आहे.घराणेशाहीतून जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी सत्तेचा हव्यास असलेल्या शेकाप, राष्ट्रवादीने तिसरी पिढी निवडणुकीच्या रिंगणात उतरवली आहे. ज्यांनी पक्षासाठी आपले आयुष्य घालवले त्यांच्या हाती मात्र पुन्हा झेंडेच आले असल्याचे दिसून येते. रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. सत्तेचा केंद्रबिंदू आपल्याकडे राहावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांची कन्या अदिती तटकरे यांना रोहे तालुक्यातील वरसे जिल्हा परिषद मतदार संघातून उमेदवारी दिली आहे. त्यांच्याकडे त्या प्रवर्गातील सक्षम कार्यकर्ता उमेदवार म्हणून सापडला नसावा आणि त्यामुळेच अदिती यांना उमेदवारी मिळाली असे मानण्यावाचून कार्यकर्त्यांकडे पर्यायच नाही. शेकापने अलिबागचे आ. सुभाष पाटील यांच्या पत्नी सुश्रुता पाटील, पेणचे आ.धैर्यशील पाटील यांच्या पत्नी नीलिमा पाटील यांना अनुक्रमे अलिबागमधील शहापूर, पेणमधील पाबळ जिल्हा परिषद मतदार संघातून उमेदवारी दिली आहे. या सर्व महिला उमेदवार अध्यक्षपदाच्या प्रमुख दावेदार मानल्या जातात. दुसरीकडे शिवसेनेने अलिबाग तालुक्यातील थळ मतदार संघातून मानसी दळवी यांना उमेदवारी दिली आहे. त्याही अध्यक्षपदाच्या रेसमध्ये आहेत.